पुणेकर महापालिकेची सुत्रे ‘राष्ट्रवादी’ला देणार – प्रशांत जगताप

Updated On:
पुणेकर महापालिकेची सुत्रे ‘राष्ट्रवादी’ला देणार – प्रशांत जगताप

पुणे – महापालिकेत 2007 ते 2017 पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. या कालावधीत झालेला सर्वांगीण विकास पुणेकरांनी पाहिला आहे. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या विकासात मोठ्या चूका झाल्या असून नागरिक तसेच लोकप्रतिनिधांचा संवादच संपला आहे. त्यामुळे पुणेकर महापालिकेची सुत्रे राष्ट्रवादीलाच देतील, असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. पुढील महापौर राष्ट्रवादीचाच असेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

दैनिक प्रभातच्या कार्यालयास शहराध्यक्ष जगताप यांनी गुरूवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पक्षाचे युवक शहराध्यक्ष महेश हांडे उपस्थित होते. जगताप म्हणाले की, समान पाणी योजना, स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, भामा आसखेड योजना, असे प्रकल्प राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात प्रत्यक्षात सुरू झाले. हे क्रेडीट सत्ताधाऱ्यांचे नाही. हे पाहता ज्या पुणेकरांनी 2017 मध्ये भाजपचे 98 नगरसेविक निवडून दिले, त्या पुणेकरांचा निश्‍चितच भ्रमनिरास झाला आहे.

आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. मात्र, त्या सोबतच निवडणूक स्वबळावर लढायचीही आमची तयारी आहे. सत्ताधाऱ्यांचे शहराबाबत चुकलेले धोरण, सत्ताधारी नगरसेवकांचे निष्क्रीय कामकाज या सगळ्या गोष्टी तसेच आम्ही या पूर्वी केलेला विकास तसेच पुण्याच्या शास्वत विकासाच्या संकल्पना घेऊन आम्ही पुणेकरांसमोर जावू आघाडी आम्ही सर्व पक्ष निवडणूक जिंकायची या एकाच हेतूने लढणार आहोत. त्यामुळे ती सन्मानाने होईल.

जागा वाटप होताना, मागील निवडणूकांच्या मतांच्या आधाराद्वारे प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा वाटप असेच धोरण स्विकारले जाईल. आघाडीची चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घेऊन न जाता प्रत्येक वेळेस उमेदवारीबाबत होणारा सावळा गोंधळ टाळण्यासाठी दिवाळीनंतर अवघ्या महिन्याभरात आघाडी होणार की नाही. झाल्यास कोण किती जागा लढवेल, हे स्पष्ट होईल असेही जगताप म्हणाले.

वाट चुकलेले पुन्हा घरी येतील…

महापालिका निवडणूकीत 2017 मध्ये राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. यावेळी अनेक वाट चुकलेले पुन्हा पक्षात येतील, असा दावा जगताप यांनी केला आहे. त्यासाठी नियोजन झालेले असून योग्य वेळी परत येतील, असे सूचक वक्‍तव्य जगताप यांनी केले.

आणखी संबंधित बातम्या

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

2026-08-23 08:01:35

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

2026-08-23 07:33:51

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

2026-08-22 21:42:18

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

2026-08-22 20:33:14

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा