मुंबई – शाश्वत विकासासाठी उद्योगांनी ऊर्जा संवर्धनावर भर देण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऍटलास कॉप्को कार्बन फूटप्रिंट कमी करून ऊर्जा संवर्धनावर भर देणारी उत्पादने सादर करणार असल्याचे या कंपनीचे महाव्यवस्थापक अँडी प्रभाकर यांनी सांगितले.
या कंपनीने नव्या न्यूमॅटेक् या नवीन ब्रॅंडची सुरुवात केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या ब्रॅंडअंतर्गत नवीन उत्पादनामुळे कंपन्यांना स्वच्छ कोरडी हवा आणि वायू उपलब्ध केले जातील. ऑटोमोटिव्ह, टेक्स्टाईल, पॉवर जनरेशन, तेल आणि नैसर्गिक वायू, खाद्य क्षेत्रासह इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांना ही उत्पादने उपलब्ध केली जाणार आहेत.
त्यामुळे या कंपन्यांकडून निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. ही उत्पादने देशातील उद्योगाबरोबरच परदेशी उद्योगांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारने शाश्वत विकासासाठी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर भर दिला आहे. भारत सरकारच्या या मोहिमेला आमच्या उत्पादनामुळे चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.