नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल. ऋत्विक रंजनम पांडे यांची आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सोळावा वित्त आयोग आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या निधी संदर्भात आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्तपुरवठा करण्याच्या सध्याच्या व्यवस्थेचे पुनरावलोकन करू शकतो. तसेच त्याबाबत योग्य शिफारसी करू शकतो.
सोळाव्या वित्त आयोगाला 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीचा समावेश असलेला अहवाल 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.