नागापूर गावात प्रात्यक्षिकांसह शेतीविषयक मार्गदर्शन
मंचर-आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आलेल्या कृषिदूतांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सेवा संस्कार संस्था मालदाड (ता. संगमनेर) येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील कृषिदूत शुभम पवार यांनी नागापुर येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करुन विविध प्रात्यक्षिक करुन दाखविले. अभ्यास दौऱ्याच्या दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये माती परीक्षण, रोग नियंत्रण, तण व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. हारदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. पी. तायडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. राऊत, प्रा. के. जी. नवले, प्रा. टी. डी. साबळे, प्राध्यापक एस. एम. कानवडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. |
|||