Pune News : बसचा ब्रेक फेल झाला अन्….; चालकाने कशी हॅन्डल केली क्रिटीकल सिच्युवेशन? व्हिडीओ पाहा…
Updated On:

Pune News : पुण्यात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. अनेक गंमतीशीर गोष्टी पुण्यात घडलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळेच तर पुण्याला पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुण्याची ओळख जशी पुणेरी पाट्या म्हणून केली जाते. तसेच पुण्यात पीएमटी बसची एक वेगळी ओळख आहे.
सध्या सोशल मीडियावर पुण्यातील पीएमटी बसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ब्रेक फेल झाल्याने बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने पुढे होणारा अपघात टळला असल्याचे ज्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्याने म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक पीएमटी बस हळूहळू जाताना दिसत आहे. त्यानंतरत एका ठिकाणी थांबली. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने सांगितले आहे की, या बसचा ब्रेक फेल झाला आणि बसच्या ड्रायव्हरने मोठ्याने ओरडून प्रवासांना खाली उतरण्यास सांगितले. यामुळे पुढे घडणारा मोठा अपघात टळला असल्याचा दावा केला आहे.
View this post on Instagram
हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ @pune.arifattar या इस्टांग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसचा ब्रेक फेल होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पीएमपीएमएल नियमित बस तपासणी आणि चालक प्रशिक्षण करते, परंतु अशा घटनांमुळे अधिक कठोर उपायांची करण्याचे गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.





