पिंपरी चिंचवड : मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची एसटी, पीएमटीकडे धाव

पिंपरी – पुणे-लोणावळा दरम्यान इंजिनिअरिंग, तांत्रिक दुरुस्ती व देखभालीच्या कामांकरिता रविवारी (दि. 4) रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला. या काळात पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान 14 लोकल च्या फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपी व एसटी बसकडे आपला मोर्चा वळविला होता. त्यामुळे मावळात जाणार्या मार्गांवरील बसमध्ये प्रवाशांनी गर्दी केली होती. तर सर्वच रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट जाणवत होता.
पुणे-रेल्वे दरम्यानच्या मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने देखभाल व दुरुस्तीचे काम काढल्याने रविवारी (दि.4) दिवसभरात लोकलच्या 14 फेर्या रद्द करत असल्याचे जाहीर केले होते. प्रसार माध्यमांमधून याबाबतची माहीती दिली होती. या बदलाची पूर्वकल्पना असल्याने बहुतांशी प्रवाशांनी एसटी व पीएमपी प्रवासी सेवेचा वापर केला. या बदलामुळे दापोडी ते लोणावळा दरम्यानच्या स्थानकांवर प्रवाशांची तुलनेत संख्या कमी असल्याचे चित्र होते.





