Thackeray brother : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत. यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा टप्पा अर्थात महापालिका निवडणुकांचा असणार आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्व सिद्ध करणारी असणार आहे. पण महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिकेसाठी ‘एकला चलो रे’ म्हणजेच स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंची युती कधी होणार याची जोरदार चर्चा होती. त्यासाठी ठाकरे बंधूंनी युतीसाठी पहिले पाऊल टाकले आहे. मनसेकडून यादी तयार मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरूवात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका २२७ प्रभागांची रचना असलेली महापालिका आहे. मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्याची उद्धवसेनेची तयारी दर्शवली आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अद्याप जागावाटपाचा फॅार्म्युला निश्चित होणे बाकी आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही माहिती समोर आली आहे. मनसेकडून उमेदवार असलेल्या आणि लढू शकणाऱ्या तसेच ज्या प्रभागांमध्ये ताकद आहे अशा जवळपास १२५ लोकांची यादी करण्यात आली आहे. उद्धवसेनेची भूमिका यापैकी ७० जागा सोडण्यासाठी उद्धवसेनेने सकारात्मकता दर्शवली आहे. पण प्रत्यक्षात दोन्हींकडून काय चर्चा होते तसेच चर्चेअंती कोणत्या वाटाघाटी होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जागावाटपात जास्तीत जास्त जागा पक्षाला घ्यायच्या पण मनसेला कुठेही दुखवायचे नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या पक्षाची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आता दुसऱ्या फेरीत जागावाटपाच्या चर्चेत आणखी काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी