Ambegaon News : धामणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

प्रभात वृत्तसेवा
लोणी धामणी – आजही हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांचे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त धामणी (ता. आंबेगाव) येथे पंचांच्या पारावर सामाजिक कार्यकर्त्या गुणवंती क्षिरसागर याच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी बोलताना सांगितले की वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी अस्मितेचे प्रतिक होते. आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांना घडवण्यात शिवसेनाप्रमुखांचा मोलाचा वाटा आहे.सरपंच अक्षयराजे विधाटे यांनी म्हणाले, आजही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उणीव सदैव जाणवते. आजच्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेनाप्रमुख असते तर महाराष्ट्राचे चित्र खुप वेगळे असते.
आजही बाळासाहेब ठाकरे यांनी घालुन दिलेल्या 80% समाजकारण व 20%राजकारण या सुत्राने आम्ही काम करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यावेळी माजी सरपंच सागर जाधव, उपसरपंच कैलास वाघ, दत्ता गवंडी, मच्छिंद्र आमाप, अमोल जाधव, रोहित भूमकर, गणपत भंडारकर, रूपेश विधाटे, माधवराव बोर्हाडे, सुजल विधाटे, जगदीश रणपिसे, बाळासाहेब भूमकर, तानाजी गाडेकर, दिनकर रोकडे, कैलास बढेकर, संतोष वायकर, तुकाराम विधाटे, चंद्रकांत जाधव आदि ग्रामस्थ उपस्थित होते.





