Eknath Shinde: विठ्ठल-रुक्मिणीची एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न; शेतकऱ्यांसाठी घातलं साकडं
Eknath Shinde: पंढरपुरात मंगलमय वातावरण; संपूर्ण पूजा विधी उत्साहात पडले पार

Eknath Shinde: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा मोठ्या भक्तिभावाने पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी पार पडली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील उंचेगाव येथील सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांना मिळाला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाकडे शेतकऱ्यांसाठी साकडं घातलं. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्यासाठी लाखो हात पुढे आले पाहिजेत, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. माझ्याकडे येणारा संकटातील माणूस कोणताही रिकाम्या हाताने परत जाऊ नये, एवढेच मागणी मी कायम पांडुरंगाकडे मागत आलो आहे. बळीराजाला या अडचणीतून बाहेर काढ हेच साकडं मी विठ्ठल-रुक्मिणीकडे घातलं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या सुरू झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सरकार आणि शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असून कोणतंही चुकीचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
याशिवाय जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी याचीही व्यवस्था करू, जी दुष्काळग्रस्तांची गरज असेल ती भागवण्याचे काम आम्ही करू, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
हेही वाचा:
Pimpri-Chinchwad: अखेर भाजपाने स्वीकृत नगरसेवकांची नावे केली जाहीर





