Team India : पांड्याला टी-20 संघाचे कर्णधारपद का मिळाले नाही? मुख्य निवडकर्त्याने केला स्वतः खुलासा…

Team India : भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच T20 विश्वचषक जिंकले होते. वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर सध्याच्या विश्वविजेत्या भारतासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते T20 मध्ये नवीन कर्णधाराची निवड. विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाईल, असे मानले जात होते, मात्र जेव्हा श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार सोडा, हार्दिक पंड्या त्यावेळी संघाचा उपकर्णधारपदही देण्यात आले नाही.
अशा परिस्थितीत बीसीसीआयने असा निर्णय का घेतला हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी दिले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यादरम्यान दोघांनीही मीडियाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी आगरकरने सूर्याला कर्णधार बनवल्याचे कारण सांगताना हार्दिकच्या फिटनेसबद्दल भाष्य केले. अजित आगरकर म्हणाले की, सूर्यकुमार यादव कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तो टी-20 मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. सर्व फॉरमॅट खेळू शकेल असा कर्णधार असावा असे सर्वांनाच वाटते. हार्दिक पांड्याच्या फिटनेसच्या समस्यामुळे त्याला वगळण्यात आले.
अजित आगरकरने पुढे स्पष्टपणे सांगितले की, हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी अडचणीचा आहे. किंबहुना, अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की हार्दिक पांड्याचा फिटनेस खूपच खराब राहिला आहे आणि फिटनेसमुळे तो मोठ्या प्रसंगी खेळू शकत नाही. याशिवाय, कर्णधारपदाचा निर्णय घेण्यापूर्वी ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचा फीडबॅकही घेण्यात आला होता, असेही आगरकर म्हणाले.
Women’s Asia Cup 2024 : टीम इंडियाला विजयी हॅटट्रिक करण्याची संधी, नेपाळविरूध्द आज रंगणार लढत…
पांड्या नेहमीच दुखापतीनं त्रस्त…
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अलीकडच्या काळात दुखापतीमुळे खूप अडचणीत आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला पाठीच्या दुखापतीची समस्या होती. त्यामुळे संपूर्ण विश्वचषकात तो केवळ चारच षटके टाकू शकला. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली होती.
Team India : रोहित-विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? हेड कोच गौतम गंभीरचं सूचक वक्तव्य…
याशिवाय, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, पंड्या दुखापतीमुळे टूर्नामेंटमधून बाहेर पडला होता. त्यानंतर भारतीय संघाला त्याची उणीव भासली आणि त्याचा परिणाम अंतिम फेरीतही दिसून आला. तसेच हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आणि नुकत्याच टी-20 विश्वचषकात अष्टपैलू खेळाडू म्हमून चांगली कामगिरी केली असली तरी त्याच्या फिटनेसमुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला.





