IND vs ZIM : टीम इंडियाने साधली विजयाची हॅट्ट्रिक! यजमान झिम्बाब्वेला केलं क्लीन स्वीप; वैभव-मयंकने निभावली महत्त्वाची भूमिका
IND vs ZIM 3rd T20I : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने ३५ धावांनी विजय मिळवत यजमान झिम्बाब्वेचा ३-० असा धुव्वा उडवून 'क्लीन स्वीप' केला आहे.

IND vs ZIM India Clean Sweep Zimbabwe 3-0 Shreyas Iyer Series Win : आयर्लंड आणि इंग्लंडमधील सलग दोन टी-२० मालिकांमधील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाने अखेर विजयाच्या मार्गावर पुनरागमन केले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने ३५ धावांनी विजय मिळवत यजमान झिम्बाब्वेचा ३-० असा धुव्वा उडवून ‘क्लीन स्वीप’ केला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखालील युवा संघाने या शानदार विजयासह संपूर्ण मालिकेत आपले वर्चस्व राखले.
वैभव सूर्यवंशीचे स्फोटक अर्धशतक; भारताच्या १९२ धावा!
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अभिषेक शर्मा (२) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. मात्र, त्यानंतर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन (२९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० चेंडूंत ७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर वैभवने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. वैभवच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील दुसऱ्या शतकाची अपेक्षा असताना तो ४९ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८१ धावा करून बाद झाला.
A solid batting effort led by Vaibhav Sooryavanshi’s fabulous knock 🔝
Over to our bowlers to defend 1️⃣9️⃣2️⃣ runs 🎯
Scorecard ▶️ https://t.co/oApMpI6eRc#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/20TaeRyVxk
— BCCI (@BCCI) July 26, 2026
कर्णधार श्रेयस अय्यरने २७ (१८ चेंडू), तिलक वर्माने नाबाद ११ आणि रिंकू सिंहने २५ (१४ चेंडू) धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९२ धावांचा मजबूत डोंगर उभा केला. झिम्बाब्वेसाठी ब्रॅड इव्हान्सने २, तर मुझाराबानी, सिकंदर रझा आणि मधेवेरे यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.
झिम्बाब्वेचा डाव १५७ धावांवर आटोपला –
Back-to-back strikes 👊
Yash Thakur with a double blow to put #TeamIndia on top 👏👏
Updates ▶️ https://t.co/oApMpI6eRc#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/D5uFbhCEiq
— BCCI (@BCCI) July 26, 2026
प्रत्युत्तरात १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ भारतीय गोलंदाजीच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १५७ धावाच करू शकला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मजबूत ठेवत झिम्बाब्वेचा ला पुनरागमन करू दिले नाही आणि ३५ धावांनी सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली. भारतासाठी मयंक यादवने सर्वाधिक ३ आणि यश ठाकूरने २ विकेट्स घेतल्या, तर अशोक शर्मा आणि रवी बिष्णोईने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.





