Table tennis : चीनची मक्तेदारी मोडण्याची आपली क्षमता – राजीव बोडस

Sports In pune : भारताच्या युवा खेळाडूंनी जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत चीनच्या खेळाडूंवर मात करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चीनच्या खेळाडूंना पराभूत करण्याची क्षमता पुण्याच्याही खेळाडूंमध्ये आहे आणि ते लवकरच हे ध्येय साध्य करतील असा आत्मविश्वास पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस यांनी व्यक्त केला.
जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या पुण्याच्या खेळाडूंचा तसेच माजी राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा सत्कार राजीव बोडस व बालुफ अटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उदय भालचंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी टेबल टेनिस संघटक श्रीकांत अंतुरकर, श्रीराम कोनकर, प्रकाश तुळपुळे, स्मिता बोडस आदी उपस्थित होते.
खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी जिल्हा संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय पदक विजेती तसेच १९ वर्षाखालील गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवणारी पृथा वर्टीकर हिला ५० हजार रुपये रोख बक्षीस तर आंतरराष्ट्रीय पदक विजेती पॅरा खेळाडू पृथ्वी बर्वे व राष्ट्रीय कनिष्ठ विजेती नैशा रेवसकर यांचा प्रत्येकी २० हजार रुपये तर राष्ट्रीय कास्य पदक विजेता नील मुळ्ये याचा पंधरा हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला. बालुफ कंपनीतर्फेही या खेळाडूंना तसेच खेळाडूंचे पालक व प्रशिक्षकांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
माजी राष्ट्रीय विजेते खेळाडू सुनील बाब्रस, सुजाता बाब्रस, आश्लेषा बोडस, अनिकेत कोपरकर, पूजा सहस्त्रबुद्धे-कोपरकर, उपेंद्र मुळ्ये यांचाही गौरव करण्यात आला. या समारंभास ज्येष्ठ संघटक डॉक्टर सतीश ठिगळे, अरविंद नातू, अजेय तुळपुळे, डॉक्टर मनोज उचगांवकर, अजय सिधये, सुरेंद्र देशपांडे, मनीषा बोडस, रोहित चौधरी, शुभंकर रेणावीकर, अविनाश जोशी इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?
पृथाला एक लाख रुपयांचे बक्षीस
आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्धा डझन पेक्षा जास्त पदके जिंकणारी पुण्याची खेळाडू पृथा वर्टीकर हिला येथील व्यावसायिक मोहिनीदेवी भिवलाल बिश्नोई यांच्यातर्फे एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये देऊन सत्कार करण्यात आला. रायझिंग स्टार क्लब तर्फे तिला वीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. आशिष बोडस यांनी स्वागत केले तर प्रकाश तुळपुळे यांनी आभार मानले.





