U-19 National Table Tennis Tournament : पृथा वर्टीकरनं पटकावलं विजेतेपद…

National Table Tennis Tournament : – पुण्याच्या पृथा वर्टीकरने शानदार कामागिरी करताना राष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदाची तिने राष्ट्रीय स्तरावर असलेले अग्रमानांकन सिद्ध केले.
चुरशीच्या अंतिम लढतीत पृथाने काव्या भट्टला ११-८,१३-११,१७-१५,११-८ असे पराभूत केले. दोन्ही खेळाडूंनी या लढतीमध्ये टॉपस्पिन फटके आणि काउंटर अटॅक असा बहारदार खेळ केला. शेवटच्या गेममध्ये पृथा हिने योग्य नियंत्रण राखताना विजेतेपद मिळविले. उपांत्य फेरीत पृथाने महाराष्ट्राच्या जेनिफर व्हर्गीसला ११-६,११-९,११-५ असे सहज नामविताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते.
पृथाने राष्ट्रीय स्पर्धामध्ये १२ सुवर्णपदके मिळविली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तिने ३ सुवर्ण, दोन रौप्य व पाच कांस्यपदकांची कामे केली आहे. तिने ६२ वेळा जिल्हा तर २९ वेळा राज्य स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावले आहे. पृथा ही चॅम्पियन अकादमीत सोमेन साह यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून ती एमआयटीमध्ये व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे.





