Asian Table Tennis C’ships 2024 : भारतीय महिला संघाची आशियाई टेबल टेनिस स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी…

Asian Table Tennis C’ships 2024 – भारतीय महिला संघाने बुधवारी झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जापान संघाकडून ३-१ पराभूत होऊन देखील पहिले कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय महिलांनी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये पदक मिळविले आहे.
🚨 INDIA WON HISTORIC FIRST EVER WOMEN’S TEAM BRONZE MEDAL AT ASIAN C’SHIP
India’s dream run as India lost to Paris Silver Medalist Team Japan 1-3 in Semi Finals
Overall an incredible and outstanding effort by our Girls through this tournament
WELL DONE GIRLS & TEAM INDIA 🇮🇳♥️ pic.twitter.com/hk6CwVqway
— The Khel India (@TheKhelIndia) October 9, 2024
पहिल्या लढतीमध्ये जपानच्या मिवा हरिमोटोने भारताच्या अहिका मुखर्जीला झुंजार लढतीमध्ये पराभूत केले. ही लढत चांगलीच रंगतदार ठरली. या लढतीत भारताच्या अहिकाने चांगली लढत दिली, मात्र तिला 8-11, 11-9 8-11, 13-11 7-11 असे पराभूत व्हावे लागले.
भारताची स्टार खेळाडू असलेल्या मनिका बत्राने सत्सुकी ओडोला 11-6, 11-5, 11-8 असे सरळ सेटमध्ये पराभूत करताना भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या लढतीमध्ये सुतीर्थ मुखर्जीला मीमा इटोविरुद्धच्या लढतीमध्ये 9-11 4-11 13-15 असा पराभव स्वीकारावा लागल्याने जापानने पुन्हा एकदा 2-1 अशी आघाडी वाढविली.
Arctic Open 2024 Badminton : ज्याची भीती होती तेच झालं; सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा…
निर्णायक लढतीमध्ये मनिका बत्राला हरिमोटोकडून पराभवाचा सामना करावा लागला. हरिमोटोने मनिकाला 3-11 11-6 2-11 3-11 असे पराभूत करताना लढतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाच फेऱ्यांच्या लढतीमध्ये जपानने 3-1 अशी आघाडी घेतल्याने शेवटची फेरी खेळली गेली नाही.





