Asian Table Tennis C’ships 2024 : भारताचा दुहेरी धमाका, महिलांच्या पाठोपाठ पुरुष संघाचीही कांस्यपदकाला गवसणी….

Asian Table Tennis C’ships 2024 : – भारतीय पुरुष संघाला आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत चायनीज तैपेईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने, कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. भारताचे या स्पर्धेतील तिसरे पदक आहे. यापूर्वी भारताने 2021 व 2023 मध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. दरम्यान, याच स्पर्धेत भारतीय महिला संघाने बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली होती. विशेष म्हणजे भारतीय महिलांचे या स्पर्धेतील हे पहिले असे ऐतिहासिक पदक होते.
उपांत्य फेरीच्य लढतीमध्ये चायनीज तैपेईने भारताला 3-0 असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर असलेल्या शरथ कमलला 11 व्या स्थानी असणाऱ्या लिन युन-जू विरुद्धच्या लढतीमध्ये 11-7, 12-10, 11-9 असा पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये आघाडीवर असून देखील शरथला पराभव स्वीकारावा लागला.
News Flash: Bronze medal for India 🥉
India go down to Chinese Taipei 0-3 in Semis of Men’s Team event at Asian Table Tennis Championships. #TableTennis pic.twitter.com/nnMPmupQk5
— India_AllSports (@India_AllSports) October 10, 2024
जागतिक क्रमवारीत 60 व्या स्थानावर असलेल्या मानव ठक्करला काओ चेंग-जुईने 11-9, 8-11, 11-3, 13-11 असे पराभूत करताना संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यांमध्ये हरमीत देसाईला हुआंग यान-चेंग याने
11-6, 11-9, 11-7 असे पराभूत करताना चायनीज तैपेईने ही लढत 3-0 अशा फरकाने जिंकली.
भारताने उपांत्यपूर्व फेरीत यजमान कझाकिस्तानचा 3-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, शरत, मानव आणि हरमीतने विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारतीय महिला संघाने याआधी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.





