सातारा, (प्रतिनिधी) – माजी नगराध्यक्ष रामकृष्ण नारायण (बन्याबापू) गोडबोले यांची 25 वी पुण्यतिथी आणि सौ. मालतीबाई गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोडबोले परिवाराच्यावतीने कलासरगम प्रस्तुत ‘स्वररजनी’ ही हिंदी, मराठी गीतांची मैफिल शाहू कला मंदिरात रविवारी (दि. 3) रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
या मैफिलीसाठी प्रवेश विनामूल्य असून, हेमंत जाधव, प्राजक्ता भिडे, चंद्रकांत शिंदे, अमृता काशीद गीते सादर करणार आहेत. शिवाजी सुतार, राजेंद्र आफळे (सिंथेसायझर), शांताराम दयाळ (तबला), स्वरा किरपेकर (हामोंनियम), केदार गुळवणी (व्हायोलिन), आशुतोष वाळिंबे (तालवाद्ये), विजय कांबळे (ऑक्टोपॅड), प्रतीक सदामते (गिटार) यांची साथ लाभणार आहे.
ध्वनिव्यवस्था सुभाष कुंभार यांची, तर संगीत संयोजन राजेंद्र आफळे यांचे आहे. या कार्यक्रमाची प्रेरणा अनिल वाळिंबे यांची असून, स्नेहल दामले सूत्रसंचालन करणार आहेत. या मैफिलीचा रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन गोडबोले परिवारातर्फे करण्यात आले आहे.