IND vs AUS : सूर्यकुमार यादवने धोनीला टाकलं मागे, ‘थाला’चा मोडला ‘हा’ खास विक्रम

सूर्यकुमार यादवचे दमदार प्रदर्शन –
सूर्यकुमार यादवने या खेळीच्या जोरावर त्याने महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम मोडला. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमध्ये १५० षटकारही पूर्ण केले. पावसामुळे सामना अपूर्ण राहिला तरी सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या सामन्यात दोन शानदार षटकार ठोकले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १५० षटकारांचा टप्पा गाठला. या कामगिरीसह त्याने एक खास विक्रम आपल्या नावे केला.
धोनीचा विक्रमही मोडला –
SKY’s Unbelievable Stretch! 🤸♂️
That leave against Hazlewood bending his knee and swaying away from a 134.2 kph bouncer was a masterclass in body control.
Pure athleticism! 🥵❤️🔥#AUSvIND #SuryakumarYadav pic.twitter.com/8WABOO8I32
— Boundary Bro (@BoundaryBro) October 29, 2025
सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला मागे टाकले. धोनीने २००७ ते २०१९ या कालावधीत १७ सामन्यांच्या १५ डावांत ३१३ धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमारने केवळ १० सामन्यांत ३६.५५ च्या सरासरीने ३२९ धावा करून धोनीला मागे टाकले.
हेही वाचा – IND vs AUS : पाऊस आला धावून, सामना गेला वाहून! भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-२० सामना रद्द
चौथ्या स्थानावर पोहोचला सूर्या –
सूर्यकुमार यादव आता भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या विक्रमामुळे एमएस धोनी एका स्थानाने खाली सरकून पाचव्या क्रमांकावर गेला आहे. या शानदार खेळीने सूर्यकुमारने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो टी-२० फॉरमॅटचा बादशाह आहे. या यादीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन अनुक्रमे पहिल्या तीन स्थानी आहेत.
हेही वाचा – IND vs AUS : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! रोहित शर्माला मागे टाकत ठरला नवा सिक्सर किंग
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सूर्यकुमार यादवच्या झंझावाती ३९ धावांनी त्याची खराब फॉर्म संपल्याचे संकेत दिले आहेत. आशिया कप २०२५ मध्ये त्याचे बॅट शांत होते. त्या स्पर्धेतील ७ सामन्यांत तो अर्धशतकही ठोकू शकला नव्हता, ज्यामुळे त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी-२० मध्ये सूर्यकुमारने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.





