IND vs AUS : पाऊस आला धावून, सामना गेला वाहून! भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-२० सामना रद्द

पावसामुळे दोनदा थांबला सामना –
सामना सुरू झाल्यानंतर पाच षटकांनंतर प्रथम पाऊस आला. त्यानंतर दोन षटकांची कपात करून सामना पुन्हा सुरू करण्यात आला आणि १८-१८ षटकांचा सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, भारताने ९.४ षटकांत १ विकेट्स गमावून ९७ धावा केल्या असताना जोरदार पाऊस पुन्हा सुरू झाला. त्यानंतर पाऊस थांबला नाही आणि सामना रद्द करावा लागला.
The first #AUSvIND T20I has been abandoned due to rain. 🌧️
Scorecard ▶️ https://t.co/VE4FvHBCbW#TeamIndia pic.twitter.com/biJYDFe9Ah
— BCCI (@BCCI) October 29, 2025
भारताकडून शुबमन गिल (३७) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (३९) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी ६२ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. सूर्यकुमार यादव २४ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा करून नाबाद राहिला, तर गिल २० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकारासह ३७ धावा करून नाबाद राहिला. अभिषेक शर्मा १९ धावा करून बाद झाला. त्याला नॅथन एलिसने बाद केले.
हेही वाचा – IND vs AUS : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! रोहित शर्माला मागे टाकत ठरला नवा सिक्सर किंग
पावसाची कमी होती शक्यता –
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कॅनबरा येथे बुधवारी तुरळक पावसाची शक्यता होती, परंतु सामना सुरू असताना पावसाची शक्यता अत्यल्प होती. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान पावसाची शक्यता १६ ते २० टक्के होती, तरीही अंदाजाच्या विरुद्ध पाऊस पडला.
हेही वाचा – Rohit Sharma Retirement : “…त्यानंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार”; प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मोठे वक्तव्य
सूर्यकुमार यादवला सूर गवसला –
भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव दीर्घकाळानंतर फॉर्मात दिसला. सूर्यकुमार आणि गिल यांनी वेगाने धावा केल्या. सूर्यकुमारने मोठी कामगिरी गाठली. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १५० षटकार पूर्ण करणारा जगातील पाचवा आणि भारताचा दुसरा फलंदाज ठरला. भारताकडून याआधी फक्त रोहित शर्माने ही कामगिरी केली आहे.





