Mamaearth : आजच्या काळात महिला देखील पुरुषांपेक्षा अधिक यश संपादन करत आहेत. अगदी प्रत्येक क्षेत्रात महिला उच्च स्थानी असल्याचे पाहायला मिळते. अशातच मामाअर्थ नावाच्या कंपनीची सह-संस्थापक असणाऱ्या गझल अलघ यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. आज भारतातील एक प्रसिद्ध पर्सनल केअर ब्रँड असून सहा वर्षाच्या आत मामाअर्थची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेड एक युनिकोर्न बनली आहे. 200 रुपयांची नोकरी सोडून कोट्यावधी रुपयांच्या कंपनीपर्यंतचा प्रवास गझल यांनी अवघ्या काही वर्षांत पूर्ण केला आहे.
गझल हरियाणाच्या गुरुग्राम येथील रहिवासी असून ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. त्यांनी त्यांचे औपचारिक शिक्षण आणि बालपणीचे शिक्षण हरियाणामध्ये पूर्ण केले. गझलने 2010 मध्ये पंजाब विद्यापीठातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये पदवी प्राप्त केली. तिने 2013 मध्ये न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ आर्टमध्ये डिझाइन आणि अप्लाइड आर्ट्समधील उन्हाळी अभ्यासक्रम आणि मॉडर्न आर्टमधील अभ्यासक्रम पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यावर गझलने आयटी क्षेत्रात कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही काम केले तर पती वरुणही हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये काम केले होते. २०१६ मध्ये जेव्हा गझल आणि वरुणने मामाअर्थ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कशी केली सुरूवात?
कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून गझलची नोकरी सुरू झाली. 2008 ते 2010 पर्यंत त्यांनी NIIT लिमिटेडमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले. यावेळी त्यांनी विविध आयटी तज्ञांना सॉफ्टवेअर आणि कोडिंग भाषांचे प्रशिक्षण दिले. 2016 मध्ये गझलने आपल्या पतीसोबत मामा अर्थ नावाच्या कंपनीची पायाभरणी केली. आपल्या मुलासाठी टॉक्सिन मुक्त बेबी उत्पादने सापडत नसल्यामुळे मामाअर्थच्या सह-संस्थापक गझल अलघ यांना टॉक्सिन मुक्त बेबी उत्पादने बनवण्याची कल्पना सुचली. त्यांना परदेशातून टॉक्सिनमुक्त उत्पादने आयात करावी लागली.
अशा स्थितीत गझलने पती वरुणसोबत २०१६ मध्ये होनासा कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड नावाचा स्टार्टअप सुरू केला आणि मामाअर्थ या ब्रँड नावाने बाजारात उत्पादने लाँच केली. मामाअर्थ आज एक मोठा ब्रँड बनला असून गझल आणि वरुणची होनासा कंपनी बाजारात बेबी केअर, स्किन केअर आणि ब्युटी सेगमेंटमध्ये अनेक उत्पादने विकते.
त्यांनी मामार्थ नावाने आपली उत्पादने बाजारात आणली. वरुण आणि गझलची कंपनी 25 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून 9800 कोटी रुपये झाली आहे. सेबीनं Honasa ला ऑगस्ट 2023 मध्ये आयपीओ लाँच करण्यास मान्यता दिली होती. कंपनीचा आयपीओ 31 ऑक्टोबर रोजी खुला झाला आहे.