हडपसर – हडपसर माळवाडी येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे . त्यानिमित्ताने रक्तदान शिबिर व मोफत थायरॉईड तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिरात रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास दत्त जयंती निमित्त ब्लुटूथ इअर बर्ड मोफत देण्यात आले,तसेच रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र ही देण्यात आले.अशी माहिती धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक दत्तात्रय तुपे यांनी दिली.रविवारी संपूर्ण दिवसभर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थापक दत्तात्रय तुपे ,अध्यक्ष बाळासाहेब तुपे, खजिनदार गणेश ससाणे, बाळासाहेब पांढरे, संतोष देशमुख, दिनेश मोरे, अमोल जाधव, काळू ससाणे, कैलास बारगुजे, अरुण कुंभार, नितीन गायकवाड, बाळासाहेब कांबळे, संतोष पाडळे, भाऊ शिर्के तसेच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. येथील मुक्ताई ब्लड बँकेच्या वतीने सुमारे पाचशे पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. ब्लड बँकेचे अविनाश ननवरे यावेळी उपस्थित होते.
रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र सगळ्या ठिकाणी निर्माण झाली आहे. ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. रक्ता अभावी कुणाचाही जीव जाऊ नये म्हणुन समाजाच्या आरोग्यसेवेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने हे शिबिर आयोजित केले आहे. त्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त दिलेला प्रतिसाद पाहून समाधान वाटले.
– दत्तात्रय तुपे ( संस्थापक, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान हडपसर )