Sarfaraz Replaces Sudharsan : बीसीसीआयचा मोठा निर्णय! साई सुदर्शन बाहेर पडताच ‘या’ धडाकेबाज फलंदाजाचे संघात सरप्राईज कमबॅक
Sarfaraz Replaces Sudharsan : अत्यंत महत्त्वाच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघात मोठा बदल केला आहे.

BCCI Announcement Sarfaraz Khan Replaces Injured Sai Sudharsan IND vs SL Test Series 2026 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरुवात होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघात मोठा बदल केला आहे. उजव्या पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलेल्या साई सुदर्शनच्या जागी मुंबईच्या स्टार फलंदाज सर्फराझ खानचा (Sarfaraz Khan) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रविवारी बीसीसीआयने अधिकृत मीडिया निवेदन जारी करत या निर्णयाची घोषणा केली.
गॉल कसोटीपूर्वी कोलंबोमध्ये जोडला जाणार!
बीसीसीआयच्या निवेदनानुसार, साई सुदर्शन बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’ (CoE) मध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीत दुखापतीतून वेगाने सावरत आहे. मात्र, कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे फिट न झाल्यामुळे निवड समितीने सर्फराझ खानला त्याच्या जागी संधी दिली आहे. १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी सर्फराझ कोलंबोमध्ये संघात सामील होईल.
२०२४ नंतर सर्फराझ खानचे पुनरागमन!
🚨 NEWS 🚨
Sai Sudharsan ruled out of the #SLvIND Test series; Sarfaraz Khan named replacement.
Details 🔽 #TeamIndia https://t.co/lF6h8jabZd pic.twitter.com/Dk0C4HI37p
— BCCI (@BCCI) August 9, 2026
सर्फराझ खानने नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर त्याला पुन्हा संघात बोलावण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत ६ कसोटी सामन्यांच्या ११ डावांमध्ये ३७१ धावा केल्या आहेत. मात्र, सराव सामन्यात देवदत्त पडिक्कलने झळकावलेले धडाकेबाज शतक पाहता, अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्फराझ ला स्थान मिळणे सोपे नसणार आहे.
भारताचा अपडेटेड कसोटी संघ: शुबमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सर्फराझ खान.





