Siraj Blitz Victory : अंतिम टप्प्यात सिराजने फिरवला सामना! सलग ३ षटकार ठोकून टीम इंडियाला मिळवून दिला थरारक विजय
Siraj Blitz Victory : भारतीय संघाने मोहम्मद सिराजच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंका इलेव्हन संघाचा ६ गडी राखून पराभव केला.

India Beat Sri Lanka XI By 6 Wickets Warm Up Match Mohammed Siraj Blitz Victory : भारत आणि श्रीलंका यांच्यातील १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली आहे. कोलंबोच्या नोंडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर पार पडलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात रविवारी भारतीय संघाने श्रीलंका ११ इलेव्हन संघाचा ६ गडी राखून शानदार पराभव केला. यजमानांनी दिलेले २०७ धावांचे आव्हान भारताने ४४.३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले.
सिराजची वादळी फटकेबाजी अन् सलग ३ सिक्सर!
एका वेळी हा सामना अनिर्णित राहिल असे वाटत असतानाच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) फलंदाजीत तुफान फटकेबाजी केली. सिराजने अवघ्या १५ चेंडूंत १ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा कुटल्या. त्याने केशरा नुवांथाच्या षटकात सलग ३ षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
DSP GOES 6️⃣ 6️⃣ 6️⃣! 🔥
Mohammed Siraj signs off the warm-up game with three sixes on the trot! 💥 #SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameofTestCricket pic.twitter.com/poApnwLVwu
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 9, 2026
गिल-जैस्वालची १०० धावांची सलामी!
Mohammed Siraj with the winning runs 🔥🔥
A successful chase in Colombo for #TeamIndia against SLC XI 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 pic.twitter.com/4rAFzHXWXN
— BCCI (@BCCI) August 9, 2026
तत्पूर्वी, श्रीलंकेने दुसरा डाव ६ बाद २०० धावांवर घोषित करत भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताकडून पहिल्या डावात अनफिट असलेला नियमित कर्णधार शुबमन गिलने ४४ धावा, तर पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या यशस्वी जैस्वालने ४६ चेंडूंत ६१ धावांची आक्रमक खेळी करत रिटायर्ट हर्ट झाला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. यानंतर ऋषभ पंतने २८ आणि ध्रुव जुरेलने १७ धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात भारतीय संघाने देवदत्त पडिकलच्या शतकाच्या जोरावर ६ बाद ३५७ धावांवर डाव घोषित केला होता. या विजयामुळे १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे.





