मुंबई – दबंग सारख्या बिग बजेट चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेल्या सोनाक्षी सिन्हाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.अकिरा आणि नूर सारख्या चित्रपटांमधून सोनाक्षीने आपले वेगळेपण कायम सिद्ध केलं आहे. यामुळेच अनेकदा सोनाक्षीला केवळ अभिनेत्यासोबतच सिनेमासाठी कास्ट केलं जात नाही तर सोलो अभिनेत्री असलेल्या कथा देखील तिच्याकडे चालत येताना दिसतात. नुकतंच सोनाक्षीने परवीन बाबी यांच्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करण्यास नकार दिल्याचे समजते.
परवीन बाबीचा बायोपिक बनवणारे निर्माते वसीम खान यांनी परवीन बाबीच्या भूमिकेसाठी सोनाक्षी सिन्हाशी संपर्क साधला होता.सोनाक्षी सिन्हाने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि चित्रपटात काम करण्यास होकार दिला. मात्र सोनाक्षी सिन्हाने चित्रपटाच्या निर्मात्याला विचारले की दिग्दर्शक कोण आहे? आणि इथेच सगळं फिस्कटलं.
पंकज पाराशर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती मिळताच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. सोनाक्षी सिन्हाने चित्रपटाचे निर्माते वसीम खान यांना सल्ला दिला की, जर त्यांनी दिग्दर्शक बदलला तर ती चित्रपटात काम करू शकते. पंकज पाराशर यांच्या जागी कोणीही दिग्दर्शक आला तरी त्याला हरकत नाही. निर्माता वसीम खान यांनी सोनाक्षी सिन्हाची ही अट मान्य केली नाही आणि सोनाक्षी सिन्हाच्या जागी उर्वशी रौतेलाला परवीन बाबीच्या बायोपिकसाठी फायनल केले.
अभिनेत्री परवीन बाबीने बॉलिवूड चांगलेच गाजवले होते. परवीन या सिनेमांसोबतच त्यांच्या अफेअरमुळे इंडस्ट्रीमध्ये चांगल्याच चर्चेत होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरी सुसाईड केल्याने एकच खळबळ उडाली होती. आता त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच येणार आहे.मात्र आता या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.