“काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात”; अजित पवारांनी भुजबळांच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी

Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar | राष्ट्रवादीच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या समोर नाराजी व्यक्त केली आहे.
भुजबळ यांनी आझाद मैदानावर मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिकेवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येते आणि पक्षाला किंमत मोजावी लागते,’ असे अजित पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या. निवडणुकीबाबत पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्ष बैठक घेऊन अधिक चर्चा करणार असल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं.
जीआर दबावाखाली काढण्यात आल्याचा भुजबळांचा आरोप
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जो जीआर काढण्यात आला आहे, तो दबावाखाली काढण्यात आला असून हा जीआर रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळांकडून करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हा निर्णय कसा काढला, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला.
तसेच, अनेक ठिकाणी खाडाखोड करून आणि नोंदी बदलून कुणबी प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजातील संभ्रम दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन





