Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलाल तर तिन्ही पक्ष एकवटणार; भुजबळांनी दिला इशारा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जे कोणी चुकीचे स्टेटमेंट करतात, आरोप करतात अशांचा महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र मुकाबला करणार असल्याचा इशारा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जे कोणी चुकीचे स्टेटमेंट करतात, आरोप करतात अशांचा महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र मुकाबला करणार असल्याचा इशारा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मर्यादा सोडून कोणी बोलत असेल तर प्रत्युत्तर देण्याचे काम तिन्ही पक्षाचे नेते आमदार कार्यकर्ते करणार आहेत. आपसात एकमेकांविरोधात बोलायचे नाही. लोकशाहीच्या नावाखाली सगळेच खपून जाईल असे नाही.
तिन्ही पक्षाचे नेते आहेत, त्यात आमदार, नेते, मंत्री यांनी एकमेकांविरेधात वावगं भाष्य करता कामा नये. ज्या अडचणी असतील त्या मुख्यमंत्री किंवा आपल्या नेत्यांकडे सांगा, असे भुजबळ म्हणाले.
तसेच, नेहमी प्रमाणे समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. नेते दादा भुसे, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, मी उपस्थित होतो. पहिल्यांदा सर्व पक्षांनी आपल्या दुष्काळासंदर्भात काम करायचे आहे, जलसंधारणाचे कामे करायची आहेत. संकटातून शेतकऱ्यांना बाहेर कसे काढायचे यावर चर्चा झाली आहे.
तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम गेली नसेल तर ताबडतोब अडचण दूर करायला पाहिजे. मदत कशी पोहोचेल यासंदर्भात काम करायचे आहे. लोकसहभाग देखील करायचा आहे. जिल्हा नियोजन समिती लवकर स्थापन करण्यासंदर्भात नावे द्यायची आहेत. डीपीडीपी संदर्भात लवकर सगळे कामाला लागतील. महामंडळासंदर्भात देखील अनेक कामे होऊ शकतात, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.






