Navi Mumbai International Airport | पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आज त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केले जाणार आहे. यानिमित्त प्रशासनाकडून उद्घाटनाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह पुण्यातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे. मात्र ही विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कसे असणार मोदींच्या दौऱ्याचे नियोजन ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील. दुपारी 3:30 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. दरम्यान, नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होण्याआधी लोककलेचे विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन मुंबई मेट्रो-3 च्या अत्रे चौक-कफ परेड दरम्यानच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण मेट्रो,लोकल आणि बसची तिकिटे ‘मुंबई वन’ या एकाच ऍपवर मोदींच्या हस्ते ‘अल्प कालावधीच्या रोजगारक्षम कार्यक्रमाचा’ प्रारंभ देशातील सर्वात मोठा हरित क्षेत्र विमानतळ प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा हरित क्षेत्र विमानतळ प्रकल्प असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीअंतर्गत तो विकसित करण्यात आला आहे. पंतप्रधान नवी मुंबईत पंतप्रधान मोदी, देशाला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या आपल्या संकल्पानुरूप सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर कार्यरत राहील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत. पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष दिला आहे. टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा वॉटर टॅक्सीने अर्थात जलमार्गाने जोडलेला देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे. विमानतळावर शाश्वत विमान इंधनासाठी समर्पित साठवणूक सुविधा, अंदाजे 47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि संपूर्ण शहरात सार्वजनिक कनेक्टिव्हिटीसाठी ईव्ही बस सेवा असतील. विमानतळाच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमध्ये स्वयंचलित प्रवासी वहन (एपीएम) या परिवहन प्रणालीचा समावेश आहे. यामुळे सर्व चारही प्रवासी टर्मिनल सुरळीतरीत्या आंतर-टर्मिनल स्थानांतरणासाठी जोडली जातील तसेच विमानतळाहून शहरांकडील पायाभूत सुविधांसाठी जोडणी उपलब्ध होईल. हेही वाचा: कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून ट्रम्प यांचे कौतुक ; भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्याचे दिले श्रेय