पुणे – सोलारीस क्लब तर्फे आयोजित दहाव्या सोलारीस करंडक जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२४ स्पर्धेच्या मुख्य फेरीत पुण्याच्या रवींद्र पांड्ये, संदीप आगाटे, प्रशांत जेटली आणि जळगांवच्या रणजीत चव्हाण या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली.
मयुर कॉलनी येथील सोलारीस क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ फेरीच्या ४५ वर्षावरील गटाच्या सामन्यात पुण्याच्या संदीप आगाटे याने पुण्याचाच खेळाडू आणि आठव्या मानांकित गजेंद्र सिंग याचा ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुण्याच्या प्रशांत जेटली याने सहाव्या मानांकित सुजीत परसोडकर याचा ६-१, ६-० असा सहज पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात अमित लाटे याने शैलेश पटवर्धन याचा ७-६ (५), ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला. पुण्याच्या आणि राष्ट्रीय खेळाडू नितीन किर्तने याने शहरसहकारी अमित किंडो याचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला. सुरतच्या धर्मेंद्र शर्मा याने महाराष्ट्राच्या विकास बचलू याचा ६-२, ७-५ असा पराभव केला.
३५ वर्षावरील गटामध्ये अग्रमानांकित आणि कर्नाटकच्या जयेश सोळंकी याने तामिळनाडूच्या मुरगून सी. याचा ६-१, ७-६ (४) असा पराभव केला. दुसर्या मानांकित संदीप पवार याने पुण्याच्या अजिंक्य पाटणकर याचा ७-६ (३), ६-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. चौथ्या मानांकित नीरज आनंद याने यशराज उभे याचा ६-०, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुण्याच्या आणि प्रशिक्षक असलेल्या रविंद्र पांड्ये पुण्याच्या अभिषेक चव्हाण याचा ६-२, ६-० असा पराभव केला.
सोलारीस करंडक टेनिस स्पर्धा : पुण्याच्या संतोष दळवी, अमित किंडोचे विजय…
पुण्याच्या संतोष दळवी याने निखील भगत याचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला. ५५ वर्षाखालील गटामध्ये जळगांवच्या रणजीत चव्हाण याने तेलंगणाच्या आणि तिसर्या मानांकित आर.व्हि. रामाराजू याचा ७-५, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पुण्याच्या आणि अग्रमानांकित अजय कामत याने पुण्याच्या डॉ. विजय हातणकर याचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला.