INDIA vs ENGLAND Test Series 2024 : – भारत व इंग्लंड यांच्यात येत्या २५ जानेवारीपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांना भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज महंमद शमी मुकणार असल्याचे बासीसीआयने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती मात्र, दुखापतीमुळे त्याने या मालिकेतून माघार घेतली होती. अद्याप तो दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नसल्याने त्याला पहिल्या दोन कसोटींना मुकावे लागणार आहे.
शमीने अद्याप गोलंदाजीचा सराव सुरू केलेला नाही. शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाऊन आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती, त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटींच्या मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र, वैद्यकीय समितीच्या मतामुळे शमीने या दोन कोसटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली.
सूर्यकुमारलाही दुखापत
या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवही उपलब्ध नसेल कारण त्यालाही दुखापत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत त्याच्या उजव्या घोट्याला दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रीया करावी लागली असून त्याला मैदानात परतण्यासाठी मोठा कालावधी गरजेचा आहे.
IND vs ENG Test Series 2024 : रणजीतील द्विशतकी खेळीमुळे ‘चेतेश्वर पुजारा’च्या निवडीची शक्यता…
त्यामुळे तो देखील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल होणार असून प्रशिक्षण व तंदुरुस्ती शिबीरानंतरच त्याच्याबाबतची माहिती बीसीसीआय जाहिर करेल. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची निवड करण्यात आलेली नाही. इंग्लंडने आपला संघ यापूर्वीच जाहीर केला असून ते पुठील आठवड्यात भारतात दाखल होतील.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
– पहिली कसोटी – २५-२९ जानेवारी, हैदराबाद
– दुसरी कसोटी – २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
– तिसरी कसोटी – १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
– चौथी कसोटी – २३-२७ फेब्रुवारी, रांची
– पाचवी कसोटी – ७-११ मार्च, धरमशाला
इंग्लंडचा कसोटी संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) , टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.