Jaykumar Gore : …तर राज्यात दुष्काळच पडला नसता; शरद पवारांच्या दुष्काळी दौर्यावर जयकुमार गोरेंची टीका
Jaykumar Gore : राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून, खरीप वाया गेल्याची व्यथा शेतकरी मांडत आहेत. राज्यातील सर्वात कमी पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला आहे.

Jaykumar Gore : राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून, खरीप वाया गेल्याची व्यथा शेतकरी मांडत आहेत. राज्यातील सर्वात कमी पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. (Jaykumar Gore)
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील दुष्काळ संदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. तसेच, राज्यात दुष्काळ परिस्थितीच्या पाहणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 28 सप्टेंबरपासून दुष्काळ पाहणी दौरा आहे. या दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही गोरे यांनी उपहासात्मक उत्तर दिले. (Jaykumar Gore)
शरद पवारांच्या या दुष्काळ पाहणी दौऱ्यामुळे सरकारला काही फायदा होईल का? असा प्रश्न गोरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, अशा अनुभवाने जर फायदा झाला असता, तर राज्यात दुष्काळच पडला नसता, असे म्हणत गोरे यांनी पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. (Jaykumar Gore)
राज्यात अनेक कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत आहेत. जर ही कामे आधी झाली असती तर दुष्काळ परिस्थिती आली नसती, असे म्हणत गोरेंनी दुष्काळाला यापूर्वीची परिस्थिती कारणीभूत असल्याचे म्हटले. (Jaykumar Gore)
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये ही मदत सुधा जाहीर करावी, अशी मागणी या पत्रात पवार यांनी केली होती. (Jaykumar Gore)
परतीचा पाऊस अपेक्षित
सोलापुर जिल्ह्यात परतीचा पाऊस पडतो. 15 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस अपेक्षित आहे, पण परतीचा पाऊस कधी येईल याची वाट न बघता आम्ही सर्व्हे करायला सांगितला आहे. सर्व्हे, रिपोर्ट वेळेत गेले पाहिजे, याची तयारी आम्ही करायला सांगितली आहे. (Jaykumar Gore)
उजनीच्या पाण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे, उजनी धरण भरलेले आहे. मात्र, 68 गावात टँकर सुरु आहेत. त्यामुळे 1 वर्षाचे पाण्याचे राखीव करून नियोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सोलापुरात 50 टक्के पाऊस पडला आहे, परिस्थिती गंभीर आहे. (Jaykumar Gore)
सोलापुरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शेतीसाठी पाणी, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात भविष्यात जी परिस्थिती उद्भवू शकते, त्यासाठी प्रशासनाला सामोरे जाता यावे यासाठी बैठक झाली, असे गोरे यांनी म्हटले. (Jaykumar Gore)
Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरे ॲक्शन मोडमध्ये; वारीच्या पूर्वतयारीचा घेतला सविस्तर आढावा






