Reel Star Mahesh Mote : रिल स्टार महेश मोटेला मनसेचा दणका; राज ठाकरेंवरील ‘ते’ विधान भोवलं, म्हणाला कोणाच्याही नादी लागा पण..
Reel Star Mahesh Mote : सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आणि रिल स्टार महेश मोटे याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणे भलतेच महागात पडले आहे.

Reel Star Mahesh Mote : सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर महेश मोटे सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला समज दिली आहे. त्यानंतर महेश मोटे राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी मागताना दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Reel Star Mahesh Mote)
हा प्रकार हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उपविभागीय अध्यक्ष शुभम जगदाळे यांच्या कार्यालयात झाल्याचे सांगितले जात आहे. शुभम जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, महेश मोटे याने काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. (Reel Star Mahesh Mote)
महेश मोटेला लावली काळी शाई
शुभम जगदाळे यांच्या दाव्यानुसार, मनसे कार्यकर्त्यांनी महेश मोटेला त्यांच्या कार्यालयात बोलावून या विधानाबाबत जाब विचारला. त्याच्या चेहऱ्यावर काळी शाई लावण्यात आली. त्यानंतर त्याने डोक्यावर चप्पल ठेवून मनसे आणि राज ठाकरे यांची माफी मागितल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Reel Star Mahesh Mote)
व्हिडीओच्या शेवटी महेश मोटे राज ठाकरे यांच्या फोटोसमोर लोटांगण घालत माफी मागताना दिसतो. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. (Reel Star Mahesh Mote)
‘पुण्यात येऊन दाखवतो’, असे आव्हान दिल्याचा दावा
शुभम जगदाळे यांनी IANSशी बोलताना सांगितले की, महेश मोटे केरळमध्ये असताना त्याने राज ठाकरेंबाबत विधान केले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांना आव्हान दिल्याचा दावा जगदाळे यांनी केला. (Reel Star Mahesh Mote)
जगदाळे यांच्या म्हणण्यानुसार, महेश मोटेने एआयच्या माध्यमातून विमानाचे बनावट तिकीट तयार करून आपण पुण्यात येत असल्याचे दाखवले आणि ‘मला पकडून दाखवा’, असे आव्हान दिले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पुण्यात बोलावून समज दिल्याचे त्यांनी सांगितले. (Reel Star Mahesh Mote)
‘MNS style’ punishment or vigilantism? Social media influencer Mahesh Mote was allegedly forced to prostrate before Raj Thackeray’s photo, smeared with black ink, and made to record a tearful apology after posting a reel mocking the party chief.#Maharashtra #MNS #RajThackeray pic.twitter.com/7xti7iP9hS
— Monu Lodhi 🇮🇳 (@monu_lodh) September 21, 2026
महेश मोटेने स्वतःही पोस्ट केला माफीचा व्हिडीओ
दरम्यान, महेश मोटेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून माफी मागतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने राज ठाकरे यांच्याबाबत अनवधानाने चुकीचे बोलल्याचे सांगितले. (Reel Star Mahesh Mote)
मी अनवधानाने राज ठाकरेंबद्दल चुकीचे बोललो. शुभम जगदाळे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांबद्दलही मी चुकीचे बोललो. रिलच्या नादात माझ्यावर आज ही वेळ आली आहे. मनसेची मी माफी मागतो, असे महेश मोटेने म्हटले आहे. तसेच, कुणाच्याही नादी लागा, पण यांच्या नादी कधीही लागू नका, असेही तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. (Reel Star Mahesh Mote)
MNS Members Arrested : भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करणे पडले महागात; मनसेच्या दोघांना पोलिसांकडून अटक





