Smriti Mandhana Record : क्रिकेटच्या पंढरीत स्मृती मानधनाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! महिला क्रिकेटच्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारी पहिलीच खेळाडू
Smriti Mandhana Record : इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात मैदानावर उतरताच स्मृती मानधनाने नवा इतिहास रचला आहे.

Smriti Mandhana 300th International Match India vs England Womens Lords Test 2026 : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना हिने क्रिकेटचा मक्का मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एक अभूतपूर्व जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात मैदानावर उतरताच स्मृती मानधनाने कारकिर्दीतील ३०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा पूर्ण केला.
यासह जागतिक क्रिकेटच्या इतिहासात वयाच्या सर्वात कमी (तरुण) वयात ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती जगातील पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. अत्यंत लहान वयात भारतीय संघाची धुरा वाहत तिने आपल्या कामगिरीने हे जागतिक स्थान मिळवले आहे.
दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री; अशी कामगिरी करणारी तिसरी भारतीय –
A momentous occasion ✨
A magnificent milestone 🙌🎥 A peek into #TeamIndia‘s huddle to listen in to Head Coach Amol Muzumdar’s words of motivation for the team and praise for Smriti Mandhana ahead of her 300th international match 🗣️#ENGvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/ioqBDSFyRQ
— BCCI Women (@BCCIWomen) July 10, 2026
जागतिक पातळीवर ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी स्मृती मानधना ही जगातील १२ वी महिला खेळाडू ठरली आहे. तर भारताचा विचार केल्यास हा टप्पा गाठणारी ती केवळ तिसरीच भारतीय महिला क्रिकेटर आहे. यापूर्वी भारताकडून चालू कर्णधार हरमनप्रीत कौर (३७४ सामने) अव्वल स्थानी असून, तिच्यानंतर महान फलंदाज मिताली राज दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता स्मृतीचाही या दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर पहिल्यांदाच रंगला महिला कसोटीचा थरार –
Vice-captain Smriti Mandhana looking in fine touch 🤌
5️⃣0️⃣ up for #TeamIndia 💙
Updates ▶️ https://t.co/O1rEau8j8n#ENGvIND pic.twitter.com/7I1B0Et4sh
— BCCI Women (@BCCIWomen) July 10, 2026
हा सामना केवळ स्मृती मानधनासाठीच नाही, तर जागतिक महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला आहे. इंग्लंडमध्ये यापूर्वी १९ वेगवेगळ्या मैदानांवर ५५ महिला कसोटी सामने खेळवले गेले आहेत. मात्र, प्रसिद्ध लॉर्ड्स (Lords) मैदानावर पहिल्यांदाच महिलांचा कसोटी सामना खेळवला जात आहे. इंग्लंडमध्ये महिलांचे सर्वाधिक ९ कसोटी सामने वूस्टरच्या काउंटी ग्राउंडवर आणि ६ कसोटी सामने ‘द ओव्हल’च्या मैदानावर खेळवले गेले आहेत.
इंग्लंडच्या भूमीवर टीम इंडिया ‘अजिंक्य’ –
इंग्लंडच्या भूमीवर भारतीय महिला संघाचा कसोटी रेकॉर्ड अत्यंत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद राहिला आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये आपला १० वा कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी खेळलेल्या ९ सामन्यांपैकी भारताने २ सामन्यांत ऐतिहासिक विजय मिळवला असून, उर्वरित ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. सर्वात अभिमानास्पद बाब म्हणजे, भारतीय महिला संघ आजपर्यंत इंग्लंडमध्ये एकही कसोटी सामना हरलेला नाही.





