Jurel Century Celebration : शतक ठोकताच जगाला दाखवला ‘तो’ टॅटू! जुरेलच्या भावुक सेलिब्रेशनने जिंकली मने; कारगिल योद्धा वडिलांना ठोकला सलाम
Jurel Century Celebration : ध्रुव जुरेलने शतकानंतर ज्या अनोख्या आणि देशभक्तीपर अंदाजात जल्लोष साजरा केला, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Dhruv Jurel Emotional Century Celebration Jai Jawan Jai Kisan Tattoo Video Viral : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) शानदार शतक झळकावत इतिहास रचला आहे. क्रमांक-७ वर फलंदाजीला येत त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदान गाजवले. मात्रJurel Century Celebration, शतकानंतर त्याने ज्या अनोख्या आणि देशभक्तीपर अंदाजात जल्लोष साजरा केला, त्याने करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेल्मेट काढले अन् जगाला दाखवला ‘जय जवान, जय किसान’चा टॅटू!
असिथा फर्नांडोच्या चेंडूवर एक धाव घेत जुरेलने आपले कसोटी शतक पूर्ण केले. शतक पूर्ण होताच त्याने हवेत जोरात ठोसा मारून आनंद व्यक्त केला. त्यानंतर हेल्मेट काढून त्याने आपला डावा हात वर केला आणि बायसेप्सवर (Biceps) गोंदवलेला ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू संपूर्ण जगाला अभिमानाने दाखवला. दुसऱ्या टोकाला असलेल्या मोहम्मद सिराजने धावत येऊन जुरेलला मिठी मारली आणि हा अविस्मरणीय क्षण साजरा केला.
कारगिल युद्धात लढले होते वडील; देशसेवेला समर्पित केले शतक –
This DJ’s got some crazy drops! 🎧💯
Second Test ton for Dhruv Jurel, with a little late drama for good measure! 😮💨
Watch #SLvIND, 2nd Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/EPPFd2doQS
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 24, 2026
ध्रुव जुरेलचे हे सेलिब्रेशन अत्यंत भावुक होते, कारण त्याचे वडील नेम सिंग जुरेल (Nem Singh Jurel) हे भारतीय सैन्यातील माजी जवान असून त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात (Kargil War) देशासाठी अतुलनीय शौर्य गाजवले होते. देशाचे रक्षण करणारे जवान आणि बळीराजा यांना समर्पित असलेला हा टॅटू दाखवून जुरेलने आपले कौटुंबिक संस्कार आणि देशभक्तीची भावना मैदानावर प्रकट केली.
हार्दिक पंड्याच्या विक्रमाशी बरोबरी; रचला नवा इतिहास –
🔴JAI JAWAN JAI KISHAN 🫡
– Dhruv Jurel show his tatto after Smashing a overseas Test Century 🔥 pic.twitter.com/dCLCrdDmda
— Sam (@cricsam02) August 24, 2026
ध्रुव जुरेल श्रीलंकेच्या भूमीवर क्रमांक-७ किंवा त्याहून खाली फलंदाजी करताना शतक ठोकणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये हार्दिक पंड्याने पल्लेकेले येथे १०८ धावांची शतकी खेळी केली होती. याशिवाय डिसेंबर २०२४ मध्ये मेलबर्नमध्ये नितीश कुमार रेड्डीच्या (११४ धावा) शतकानंतर भारतासाठी ७ व्या क्रमांकावर शतक झळकावणारा जुरेल पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेतील कसोटी शतक झळकावणारा तो भारताचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.





