Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंचा दणका; दारू पिऊन वर्गात झोपणारा मुख्याध्यापक निलंबित
Abhijeet Dipke : हिंगोलीच्या लिंबाळा जिल्हा परिषद शाळेत दारू पिऊन झोपणाऱ्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.

Abhijeet Dipke : जिल्हा परिषद शाळेत दारू पिऊन झोपणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, मुख्याध्यापक निलंबित झाल्यानंतरही अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम आहेत. (Abhijeet Dipke)
‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत अभिजीत दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. याचदरम्यान लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक दारूच्या नशेत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. ते शाळेतच दारू पित असल्याचा आरोप करण्यात आला होता. (Abhijeet Dipke)
या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत दिपके यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मुख्याध्यापक विनोद कटके यांच्या निलंबनाचे आदेश काढले. (Abhijeet Dipke)
मात्र, आता दिपकेंनी शाळेला चार नवीन शिक्षक द्यावेत, अशी मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. (Abhijeet Dipke)
शिक्षण अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा झाल्यानंतर मागणीबाबत लेखी आश्वासन देण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता प्रशासन दिपकेंच्या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. (Abhijeet Dipke)
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पुढील अजेंड्याबाबत स्पष्ट केली भूमिका





