Abhijeet Dipke : अभिजीत दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पुढील अजेंड्याबाबत स्पष्ट केली भूमिका
Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टी संघटना सध्या कोणत्याही निवडणुकीच्या राजकारणात उतरणार किंवा राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, असे स्पष्ट मत संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी व्यक्त केले आहे.

Abhijeet Dipke : जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर देशभर चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) या संघटनेने आता पुढील वाटचालीसाठी दोन दिवसीय ‘कॉक्रोच कॉन्क्लेव्ह’चे आयोजन केले आहे. या बैठकीत संघटनेचा विस्तार, आगामी आंदोलनांची दिशा आणि विविध राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होत असून, संघटनेचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संघटना सध्या राजकीय पक्षात रूपांतरित होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Abhijeet Dipke)
कॉन्क्लेव्हच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना दिपके म्हणाले की, जंतर-मंतरवरील आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर संघटनेबाबत लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे देशभरात संघटनात्मक विस्तार कसा करायचा आणि पुढील आंदोलनांची रणनीती काय असावी, यावर दोन दिवस सखोल चर्चा केली जाणार आहे. बैठकीतील निर्णयांची माहिती दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Abhijeet Dipke)
झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही CJP ने पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल आणि प्रतिनिधी तेथेही जाणार असल्याची माहिती दिपके यांनी दिली. (Abhijeet Dipke)
दरम्यान, CJP राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवणार का, या चर्चांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “सध्या आम्ही राजकारणात उतरण्याचा कोणताही विचार करत नाही. देशातील राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि माध्यमांवरील लोकांचा विश्वास कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आणखी एक राजकीय पक्ष उभा करण्यापेक्षा जनआंदोलन आणि दबाव गट अधिक प्रभावी ठरतील,” असे ते म्हणाले. (Abhijeet Dipke)
आजच्या राजकारणात निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षांतर करतात, सरकारे बदलतात आणि लोकशाही संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी जनतेला विचारधारांच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याचे आवाहन केले. (Abhijeet Dipke)
याशिवाय, सरकारचे प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयक, E20 इंधन धोरण, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवरही या कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा होणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले. (Abhijeet Dipke)






