SL vs AFG : कुसल मेंडिसच्या वादळी खेळीने अफगानिस्तानचे स्वप्न भंगले, श्रीलंकेसह बांग्लादेश सुपर-4 मध्ये दाखल!

SL vs AFG Sri Lanka defeats Afghanistan by 6 wickets : आशिया कप 2025 च्या ग्रुप-बी मधील शेवटच्या लीग सामन्यात श्रीलंकेने अफगानिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत त्यांचे सुपर-4 मधील स्वप्न भंग केले. या विजयासह बांग्लादेशने सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने शानदार अर्धशतकी खेळी करत अफगानिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीच्या तुफानी खेळीवर पाणी फेरले.
श्रीलंकेसह बांगलादेश सुपर फोरमध्ये दाखल, अफगाणिस्तान बाहेर –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगानिस्तानने मोहम्मद नबीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर 169 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, कुसल मेंडिसच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत लक्ष्याचा सहज पाठलाग केला. मेंडिसने आपल्या शानदार अर्धशतकाने संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला. या पराभवामुळे अफगानिस्तानचे आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आले, तर श्रीलंका आणि बांग्लादेश आता सुपर-4 मध्ये एकमेकांविरुद्ध लढतील. मेंडिसच्या या खेळीने श्रीलंकेचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.
कुसल मेंडिसने साकारली नाबाद 74 धावांची वादळी खेळी –
Mendis – The Run Machine 🏏🔥
A masterclass knock that crushed Afghanistan’s hopes and cleared the path for Bangladesh into the Super 4! ✨🇱🇰➡️🇧🇩#AsiaCup2025 #AFGvSL #kusalmendis pic.twitter.com/Fl0Y15pWTc
— CricInformer (@CricInformer) September 18, 2025
श्रीलंकेने अफगाणिस्तानविरुद्ध 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 18.4 षटकांत 4 गडी गमावून शानदार विजय मिळवला. श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने अत्यंत आकर्षक अर्धशतकीय खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 52 चेंडूंत 10 चौकारांसह नाबाद 74 धावांची खेळी केली. कुसल मेंडिससह कुसल परेराने 20 चेंडूंत 3 चौकारांसह 28 धावा जोडल्या, तर कामिंदु मेंडिसने 13 चेंडूंत 2 षटकारांसह नाबाद 26 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा – Mohammad Nabi : मोहम्मद नबीने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू!
मोहम्मद नबीची तुफानी खेळी ठरली व्यर्थ –
Now Afghanistan head coach Jonathan Trott can Google to see if Afghanistan is in the semi-finals of the 2025 Asia Cup.
Pride is the root of the downfall.
Haha ha ha ha ha Bangladesh officially into the Asia Cup semi Finals#AsiaCup2025 #SLvsAFG #Bangladesh #BangladeshCricket pic.twitter.com/Kg26GedIJZ— Monirul Ibna Rabjal 🇧🇩🇪🇺 (@to2monirul) September 18, 2025
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावा केल्या. अष्टपैलू मोहम्मद नबीने केवळ 22 चेंडूंत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 60 धावांची तुफानी खेळी केली, परंतु त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. परिणामी, अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले.
हेही वाचा –Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आपल्या बॉलिंग रनअपवर ‘जेएसए’ का लिहितो? जाणून घ्या कारण
नबीव्यतिरिक्त, इब्राहिम जादरानने 27 चेंडूंत 1 षटकारासह 24 धावा, कर्णधार राशिद खानने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकारासह 24 धावा, तर सलामीवीर सेदिकुल्लाह अटलने 14 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकारासह 18 धावा केल्या. अन्य फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने सर्वाधिक 4 गडी बाद केले, तर दुष्मंथा चमिरा, दुनिथ वेलालागे आणि दासुन शनाका यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.





