Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आपल्या बॉलिंग रनअपवर ‘जेएसए’ का लिहितो? जाणून घ्या कारण

Jasprit Bumrah’s JSA Mark Video : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह प्रत्येक सामन्यापूर्वी आपल्या बॉलिंग रनअप मार्कचा एक खास रिवाज पाळतो. इतर गोलंदाजांप्रमाणे तोही आपला रनअप मार्क तयार करतो, पण आता त्याच्या मार्कमध्ये एक खास गोष्ट लपलेली आहे. जिथे हार्दिक पांड्या आपल्या रनअप मार्कवर एचपी, मोहम्मद सिराज एमएस आणि अक्षर पटेल एपी लिहितात, तिथे जसप्रीत बुमराह याने आता एक वेगळी शैली अवलंबली आहे.
काय आहे ‘जेएसए’ बॉलिंग रनअप मार्क?
जसप्रीत बुमराह आता आपल्या बॉलिंग रनअप मार्कवर एक किंवा दोन नव्हे, तर तीन अक्षरे लिहितो ‘जेएसए’. या तीन अक्षरांमागील कहाणी अत्यंत खास आणि हृदयस्पर्शी आहे. ‘जेएसए’ मधील ‘जे’ जसप्रीत दर्शवते, तर ‘एस’ त्याची पत्नी संजना हिचे प्रतीक आहे. संजना ही एक प्रसिद्ध ब्रॉडकास्टर असून, ती अनेकदा सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेताना टीव्हीवर दिसते. तसेच, ‘जेएसए’ मधील ‘ए’ हा त्यांचा मुलगा अंगद याचे प्रतिनिधित्व करतो.
एशियन क्रिकेट काउन्सिलनेही शेअर केला व्हिडीओ –
View this post on Instagram
अशा प्रकारे, बुमराहने आपल्या बॉलिंग रनअप मार्कवर ‘जेएसए’ लिहिण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी जसप्रीत आपल्या रनअप मार्कवर ‘जेबी’ लिहायचा. लग्नानंतर त्याने ‘जेएस’ लिहिण्यास सुरुवात केली, पण मुलगा अंगदच्या जन्मानंतर त्याने ‘जेएसए’ ही नवी ओळख निवडली. याचा एक व्हिडीओ एशियन क्रिकेट काउन्सिलनेही शेअर केला आहे, ज्यामध्ये बुमराह रनअप मार्क तयार करताना ‘जेएसए’ लिहिताना दिसत आहे.
हेही वाचा – IND A vs AUS A : ध्रुव जुरेलचा कांगारुंना शतकी तडाखा; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकला दावा
सध्या जसप्रीत बुमराह आशिया कप 2025 मध्ये खेळत आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये भाग घेतला, पण भारताने सुपर 4 मध्ये स्थान पक्के केल्याने आणि पुढील सामना ओमानसारख्या कमकुवत संघाविरुद्ध असल्याने, त्याला तिसऱ्या सामन्यात विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.





