Sikandar Raza Record : सिंकदर रझाने रचला नवा इतिहास! १४ वर्षांनंतर विश्वचषकात पहिल्यांदाच घडला असा चमत्कार, सूर्यालाही टाकलं मागं
Sikandar Raza Record : सिकंदर रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रझाने या सामन्यात अशा विक्रमाची नोंद केली आहे, जो गेल्या १४ वर्षांत कोणालाही जमला नव्हता.

Sikandar Raza Record T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ मधील झिम्बाब्वेचा प्रवास जरी संपला असला, तरी त्यांच्या कर्णधाराने जाता जाता क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला, मात्र कर्णधार सिकंदर रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रझाने या सामन्यात अशा विक्रमाची नोंद केली आहे, जो गेल्या १४ वर्षांत कोणालाही जमला नव्हता.
१४ वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरावृत्ती –
सिकंदर रझाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि त्यानंतर गोलंदाजी करताना ३ विकेट्स देखील घेतले. टी-२० विश्वचषकाच्या एकाच सामन्यात ५० हून अधिक धावा आणि ३ विकेट्स घेणारा तो जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.
विशेष म्हणजे, एकाच टी-२० विश्वचषक सामन्यात ७० पेक्षा जास्त धावा आणि ३ विकेट्स घेणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी २०१२ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनने भारताविरुद्ध ७२ धावा आणि ३ विकेट्स घेत असा पराक्रम केला होता. तब्बल १४ वर्षांनंतर रझाने या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.
सूर्यकुमार यादवला टाकले मागे –
Sikandar Raza signed off from the #T20WorldCup with a special all-round performance 👏
He wins the @aramco POTM 🏅 pic.twitter.com/FKkUoZX9bm
— T20 World Cup (@T20WorldCup) March 1, 2026
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी सिकंदर रझाला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (POTM) पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कारासह त्याने भारताच्या सूर्यकुमार यादवला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे:
- सिकंदर रझा: १३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २१ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’.
- सूर्यकुमार यादव: ११० सामन्यांत १७ वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’
सध्या आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक २२ वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा जागतिक विक्रम अमेरिकेच्या (USA) विरनदीप सिंहच्या नावावर आहे.
| खेळाडू | सामने | प्लेअर ऑफ द मॅच |
| विरनदीप सिंह (USA) | १११ | २२ |
| सिकंदर रझा (ZIM) | १३३ | २१ |
| सूर्यकुमार यादव (IND) | ११० | १७ |






