IPL 2025 पुढे ढकलल्याने बीसीसीआय आणि फ्रँचायझींचे तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

IPL 2025 Postponement Losses : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, ही स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या धक्क्याचा परिणाम फक्त बीसीसीआय किंवा आयपीएलवर झाला नाही तर त्याच्याशी संबंधित सर्व लोकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये विविध विक्रेते, आयपीएल सामने आयोजित करणारी शहरे आणि इतर अनेक लहान-मोठे व्यावसायिक यांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये अजूनही १६ सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये चार प्लेऑफ सामने समाविष्ट आहेत. परंतु, देश ज्या परिस्थितीतून जात आहे ते पाहता, कोणत्याही नुकसानाचे काही मूल्य नाही. असे असूनही, आयपीएल पुढे ढकलल्यामुळे बीसीसीआयला प्रत्येक सामन्यात सुमारे १०० ते १२५ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल शक्य तितक्या लवकर स्पर्धा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, सर्व फ्रँचायझींमध्ये परदेशी खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची संख्या खूप जास्त आहे.
🚨 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋 𝐒𝐓𝐀𝐓𝐄𝐌𝐄𝐍𝐓 #IPL2025🚨
IPL 2025 has been suspended for one week with immediate effect.
The decision stands in support of our armed forces. Further delays are possible depending on how the situation unfolds.#IPL | #IPLSuspended | #IndiaPakistanWar pic.twitter.com/dqrdIj7Dxf
— Indian Cricket Team (@incricketteam) May 9, 2025
परदेशी खेळाडू आणि स्टाफची चिंता –
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यापासून, सर्व परदेशी खेळाडू आणि कर्मचारी त्यांच्या देशात परतू लागले आहेत. पण यातील अनेक खेळाडू आणि कर्मचारी असे आहेत, ज्यांचा बीसीसीआयवर खूप विश्वास आहे. अशा परिस्थितीत, जर त्याचे राष्ट्रीय कर्तव्य आड आले नाही, तर ते आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतण्यास नक्कीच आवडेल. या सर्वात बीसीसीआयची पहिली प्राथमिकता मे महिन्यातच आयपीएल पूर्ण करणे आहे. जर असे झाले नाही तर भारताकडे ऑगस्ट आणि सप्टेंबरची खिडकी आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धा रद्द झाली तर… –
🚨 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋 𝐔𝐏𝐃𝐀𝐓𝐄 🚨
After reviewing the situation with Indian Government, #IPL2025 is suspended for a week with immediate effect.
The decision is to support the armed forces. Further delay is possible based on the situation.#IPLSuspended #IndiaPakistanWar pic.twitter.com/qzcMhUO3Ih
— Indian Cricket Team (@incricketteam) May 9, 2025
पण, यामुळे भारताचा बांगलादेश दौरा आणि टी-२० आशिया कपचे वेळापत्रक रद्द करावे लागू शकते. त्याचबरोबर जर आयपीएल २०२५ पूर्णपणे रद्द झाले तर काय होईल, अशी भीतीही आहे. अशा परिस्थितीत, होस्ट ब्रॉडकास्टर्सनी त्यांच्या अंदाजे ५,५०० कोटी रुपयांच्या जाहिरात उत्पन्नाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त रक्कम गमावण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम सर्व दहा फ्रँचायझींवरही होईल. यामध्येही, जे आयपीएलच्या केंद्रीय महसूल पूलवर अवलंबून आहेत, ज्यामध्ये प्रसारण आणि प्रायोजकत्व हक्कांचा समावेश आहे, त्यांना सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागेल.
हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलचे खेळाडू वंदे भारत ट्रेनने दिल्लीत दाखल, खेळाडूंनी भारतीय रेल्वेचे मानले आभार
याशिवाय, गेट कलेक्शनचाही प्रश्न आहे. चार प्लेऑफ सामन्यांमधून मिळणारा गेट कलेक्शन बीसीसीआयची मालमत्ता असेल, तर सात घरच्या लीग सामन्यांमधून मिळणारा गेट कलेक्शन त्या शहरातील फ्रँचायझीकडे जाईल. यामध्ये, आरसीबीच्या होम ग्राउंडवर दोन सामने खेळवले जाणार आहेत. त्याच्या सामन्याच्या तिकिटांचे शुल्क इतर ठिकाणांपेक्षा महाग आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल थांबवल्याने केवळ आरसीबीच्या कामगिरीवरच परिणाम होणार नाही तर त्यांच्या खिशावरही परिणाम होईल.





