Rajasthan Royals : राहुल द्रविडनंतर राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ दोन प्रशिक्षकांनीही सोडली साथ, समोर आलं मोठं कारण

साईराज बहुतुले आणि दिशांत याग्निक यांची सुट्टी –
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक यांच्यासोबतचे करार संपुष्टात आणले आहेत. राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर फ्रँचायझीचे सीईओ जॅक लश मॅक्क्रम यांनीही संघाला रामराम ठोकला. आता क्रिकबझच्या अहवालानुसार, राजस्थान रॉयल्सने साईराज बहुतुले आणि दिशांत याग्निक यांच्यासोबतचे करार संपवले आहेत.
🚨The purge continues at Rajasthan Royals🚨
The franchise has now parted ways with spin-bowling coach Sairaj Bahutule and fielding coach Dishant Yagnik#RajasthanRoyals #IPL pic.twitter.com/ouESP3WfpM
— Cricbuzz (@cricbuzz) October 3, 2025
बहुतुले यांनी आयपीएल 2025 पूर्वी बीसीसीआयच्या बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षण कर्मचाऱ्यांमधून राजीनामा देऊन राजस्थान रॉयल्सच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. दुसरीकडे, दिशांत याग्निक यांचा राजस्थान रॉयल्सशी दीर्घकाळचा संबंध आहे. त्यांनी प्रथम फ्रँचायझीसाठी खेळाडू म्हणून योगदान दिले आणि नंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये सामील झाले.
हेही वाचा – IND vs AUS : विराट-रोहितचं पुनरामगन निश्चित! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी ‘या’ दिवशी होणार संघाची घोषणा
कुमार संगकारा यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा –
आयपीएल 2026 हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने तयारी सुरू केली आहे. सध्याचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. संगकारा यांनी यापूर्वी आयपीएल 2024 मध्ये संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.
हेही वाचा – ENG W vs SA W : दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सनी दारुण पराभव, गेल्या २० वर्षांत प्रथमच घडलं असं
2025 च्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर राजस्थान रॉयल्सने पुढील हंगामात मजबूत पुनरागमन करण्यासाठी हे बदल केले असून, चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत





