IPL 2025 : आयपीएलचे खेळाडू वंदे भारत ट्रेनने दिल्लीत दाखल, खेळाडूंनी भारतीय रेल्वेचे मानले आभार

Vande Bharat Special for IPL 2025 Players crew staff : भारतीय रेल्वेने आयपीएल खेळाडू, क्रू मेंबर्स, कमेंटेटर्स आणि सपोर्ट स्टाफसाठी एक विशेष ट्रेन चालवली. बीसीसीआयच्या आवाहनानंतर भारतीय रेल्वेने आयपीएल खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वंदे भारत ट्रेन चालवली. आयपीएलशी संबंधित सर्व लोकांना वंदे भारत ट्रेनने नवी दिल्लीला सुरक्षितपणे आणण्यात आले आहे. बीसीसीआयने याबद्दल भारतीय रेल्वेचे आभार मानले आहेत.
वंदे भारत स्पेशल ट्रेन पठाणकोटहून निघाली आणि दिल्लीला पोहोचली. जालंधरहून खेळाडू आणि लीगशी संबंधित लोक या ट्रेनमध्ये चढले. रेल्वेने आज जम्मू आणि काश्मीरहून पाच विशेष गाड्या चालवल्या. विमानतळ बंद असल्याने जम्मू आणि आसपासच्या भागात अडकलेल्या लोकांना विशेष गाड्यांद्वारे दिल्लीला आणले जात आहे. सर्व आयपीएल खेळाडू आणि अधिकारी कारने जालंधरला पोहोचले आणि नंतर त्यांना जालंधरहून एका विशेष ट्रेनने दिल्लीला आणण्यात आले.
Thank you, @RailMinIndia, for arranging a special Vande Bharat train on such short notice to ferry the players, support staff, commentators, production crew members, and operations staff to New Delhi.
We deeply appreciate your swift response. 🙌🏽@AshwiniVaishnaw | @JayShah |… pic.twitter.com/tUwzc5nGWD
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025
आयपीएलने शेअर केला खास व्हिडीओ –
आयपीएलने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आयपीएलशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ वंदे भारतमध्ये बसलेले दिसत आहेत. या सुरक्षित प्रवासासाठी आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवल्याबद्दल आयपीएलने भारतीय रेल्वेचे आभार मानले आहेत. या व्हिडिओमध्ये कुलदीपने रेल्वे प्रवासातील त्याच्या सुखद अनुभवाबद्दल सांगितले. या व्हिडिओमध्ये कुलदीपने भारतीय रेल्वेचे आभार मानले.
धर्मशाला येथील पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव मध्येच थांबवण्यात आला. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १० षटकांत १२२ धावा केल्या. तथापि, अचानक ११ व्या षटकात फ्लडलाइट्स गेले. त्यानंतर, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सीमारेषेजवळ उभे राहून सुरक्षेच्या कारणास्तव चाहत्यांना मैदान सोडण्याचा इशारा केला.





