Shubman Gill on Virat Kohli and Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या, १० ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेत हे दोन्ही दिग्गज खेळाडू शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत. या मालिकेपूर्वी या दोघांबद्दल नक्की काय म्हणाला? जाणून घेऊया. आगरकरांचे कोड्यात टाकणारे उत्तर, गिलचे स्पष्ट मत – चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आणि अवघ्या आठ महिन्यांत दोन आयसीसी ट्रॉफी मिळवूनही रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्या जागी शुबमन गिल याला भारतीय वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या बदलानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडीनंतर रोहित आणि विराटच्या वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत संदिग्ध उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, या दोघांनी त्यांच्या भविष्यातील योजनांबाबत स्पष्टता दिलेली नाही. मात्र, शुबमन गिल याने याबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : हिरोचा झाला झिरो; वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम रोहित आणि विराट यशाची गुरुकिल्ली – गिल शुबमन गिलने आगामी वनडे वर्ल्ड कपमधील यशासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत व्यक्त केले. तो म्हणाला, “रोहित आणि विराट यांच्याकडे प्रचंड अनुभव आणि कौशल्य आहे. हा अनुभव सहजासहजी मिळत नाही. त्यांच्या अनुभवाच्या आणि क्षमतेच्या जोरावर ही जोडी केवळ भारतीय संघातच नव्हे, तर जगात अव्वल आहे. वर्ल्ड कपमध्ये ते भारताच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील.” हेही वाचा – Rinku Singh Threat : धक्कादायक! रिंकू सिंगला दाऊदच्या डी-कंपनीकडून 10 कोटींची खंडणीची धमकी! नेमकं प्रकरण काय? या दोघांनी वर्ल्ड कपमध्ये खेळावे, अशी अपेक्षा गिल याने व्यक्त केली. या दोघांबाबत नकारात्मक चर्चा सुरू असताना गिलचे सकारात्मक वक्तव्य क्रिकेटप्रेमींसाठी दिलासादायक आहे.भारतीय संघ आता उद्याच्या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघ वेस्ट इंडिजला मालिकेत २-० ने पराभूत करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.