IND vs WI : जड्डूचा ऐतिहासिक पराक्रम! अनिल कुंबळेला मागे टाकत बनला ‘किंग ऑफ द होम’

कुंबळेला मागे टाकत जडेजा बनला नंबर वन –
रवींद्र जडेजाने हा पुरस्कार जिंकत भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. कुंबळेने 63 कसोटी सामन्यांमध्ये 9 वेळा हा पुरस्कार जिंकला होता. मात्र, जडेजाने अवघ्या 50 कसोटी सामन्यांमध्ये 10 वेळा हा पुरस्कार मिळवत आपली सातत्यपूर्ण आणि सामन्याचा निकाल बदलणारी क्षमता दाखवून दिली. या कामगिरीमुळे तो भारतातील सर्वात प्रभावी खेळाडूंपैकी एक ठरला आहे.
रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी –
𝙒𝙖𝙧𝙧𝙞𝙤𝙧’𝙨 𝙀𝙛𝙛𝙤𝙧𝙩 ⚔
1️⃣0️⃣4️⃣* runs with the bat 👏
4️⃣/5️⃣4️⃣ with the ball in the second innings 👌Ravindra Jadeja is the Player of the Match for his superb show in the first #INDvWI Test 🥇
Scorecard ▶ https://t.co/MNXdZceTab#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/xImlHNlKJk
— BCCI (@BCCI) October 4, 2025
अहमदाबाद कसोटी सामन्यात जडेजाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवशी त्याने फलंदाजीत शानदार शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय डावाला मजबूत पाया मिळाला. त्यानंतर, वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि 54 धावांत 4 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. त्याच्या या अष्टपैलू योगदानामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
भारतातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारे खेळाडू :
- रवींद्र जडेजा – 10 पुरस्कार – 50 सामने
- अनिल कुंबळे – 9 पुरस्कार – 63 सामने
- विराट कोहली – 8 पुरस्कार – 55 सामने
- सचिन तेंडुलकर – 8 पुरस्कार – 94 सामने
- रविचंद्रन अश्विन – 7 पुरस्कार – 65 सामने
सचिनचा विक्रम अजूनही अबाधित –
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 14 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. यादीत पुढील क्रमांकावर राहुल द्रविड आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे, ज्यांनी अनुक्रमे 163 आणि 86 टेस्ट सामन्यांमध्ये 11 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारे खेळाडू:
- सचिन तेंडुलकर – 14 पुरस्कार – 200 सामने
- राहुल द्रविड – 11 पुरस्कार – 163 सामने
- रवींद्र जडेजा – 11 पुरस्कार – 86 सामने
- आर. अश्विन – 10 पुरस्कार – 106 सामने
- विराट कोहली – 10 पुरस्कार – 123 सामने





