ICC Awards : आयसीसीची मोठी घोषणा! शुबमन गिल आणि बेन स्टोक्समध्ये पुन्हा टक्कर

ICC Player of the Month for July : भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत फलंदाजीने कमाल केली आहे. त्याने या मालिकेत धावांचा पाऊस पाडला आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आता त्याला आयसीसीचा प्रतिष्ठित ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारही मिळण्याची शक्यता आहे. पण, यासाठी त्याला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर यांच्याशी कडवी टक्कर द्यावी लागणार आहे. कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आयसीसीच्या जुलै महिन्याच्या नामांकनात गिल, स्टोक्स आणि मुल्डर –
आयसीसीने जुलै महिन्यासाठी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली आहेत. यात भारतीय कर्णधार शुबमन गिल, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर यांचा समावेश आहे. गिलसाठी जुलै महिना खास ठरला. त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये 94.50 च्या सरासरीने 567 धावा केल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका जून ते ऑगस्ट या कालावधीत खेळली गेली, परंतु या पुरस्कारासाठी फक्त जुलै महिन्यातील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.
एजबॅस्टन कसोटीत गिलची कमाल –
Two captains in red-hot form and a rising South African all-rounder are your ICC Men’s Player of the Month nominees for July 2025 🔥
More ➡️ https://t.co/1YLjnbvHfs pic.twitter.com/AUry4j3JWG
— ICC (@ICC) August 6, 2025
जुलै महिन्यातील एजबॅस्टन कसोटी सामना गिलसाठी सर्वात लक्षवेधी ठरला. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 269 आणि दुसऱ्या डावात 161 धावा फटकावल्या. एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये त्याने एकूण 430 धावा केल्या. एका कसोटी सामन्यात यापेक्षा जास्त धावा फक्त इंग्लंडच्या ग्राहम गूच यांनी (456 धावा) केल्या आहेत. याशिवाय, ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीतही गिलने 103 धावांची शतकी खेळी केली.
हेही वाचा – Rashid Khan : राशिद खानचा टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
वियान मुल्डरचा त्रिशतकी धमाका –
दुसरा दावेदार वियान मुल्डर याने झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने 367 धावांची खणखणीत खेळी केली. एकवेळ असे वाटले की, तो ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडेल, पण कर्णधार म्हणून त्याने स्वतः डाव घोषित करत लाराच्या विक्रमाकडे पाठ फिरवली. तरीही, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराच्या सर्वात मोठ्या वैयक्तिक खेळीचा विक्रम नोंदवला. मालिकेत त्याने 265.50 च्या सरासरीने 531 धावा केल्या.
हेही वाचा – Sachin Tendulkar : ‘तो फक्त एक योगायोग…!’, बुमराहवर टीका करणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर
बेन स्टोक्सचा सर्वांगीण कामगिरी –
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही या पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीने मोलाचे योगदान दिले. जुलै महिन्यात त्याने 50.20 च्या सरासरीने 251 धावा केल्या आणि 26.33 च्या सरासरीने 12 विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे, सलग दोन सामन्यांमध्ये त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.





