शिर्डी – श्री साईबाबा संस्थानतर्फे आयोजित श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्णजन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात काल (बुधवार) रात्री 10 ते 12 यावेळेत स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदिरप्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी व साईभक्त उपस्थित होते. त्यानंतर श्रींची शेजारती झाली.
आज (गुरुवार) सकाळी 10 ते 12 यावेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात स्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर 12 वाजता दहिहंडी फोडण्यात आली. या वेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.