Shresta Iyer Trolled : पंजाब बाहेर पडताच श्रेयसची बहीण होतेय ट्रोल! ऑफिसमध्ये फोन करून शिवीगाळ; श्रेष्ठाने केला खुलासा, पाहा VIDEO
Shresta Iyer Trolled : भारताचा स्टार क्रिकेटर आणि पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असून तिला अतोनात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Shresta Iyer Trolled IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करताच पंजाब किंग्सचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. पंजाबचा संघ केवळ १ गुणाने बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. मात्र, पंजाब किंग्सच्या या एक्झिटनंतर मैदानाबाहेरील एक वेगळाच वाद पेटला आहे. भारताचा स्टार क्रिकेटर आणि पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असून तिला अतोनात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एका जुन्या रील व्हिडिओमुळे हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे.
काय होतं ‘ते’ जुनं रील? ज्यामुळे ट्रोलर्स भडकले
काही दिवसांपूर्वी श्रेष्ठा अय्यरने पंजाब किंग्स आणि केकेआर या दोन संघांना घेऊन एक हलका-फुलका, मजेशीर रील व्हिडीओ इन्स्टावर बनवला होता. ज्यामध्ये एक पॉईंट देऊन टाकल्याचा उल्लेख होता. परंतु, आता पंजाबचा संघ अवघ्या एक पॉईंटमुळे प्ले-ऑफमधून अधिकृतपणे बाहेर पडताच, संतप्त चाहत्यांनी श्रेष्ठाचा तो जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल करण्यास सुरुवात केली आणि तिला थेट लक्ष्य केले. सोशल मीडियावरील वाढत्या ट्रोलिंग आणि धमक्यांनंतर श्रेष्ठाने स्वतः इन्स्टावर दोन व्हिडीओ शेअर करत या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Punjab Kings got eliminated from the 2026 IPL because of that one point. 😂😂 pic.twitter.com/WU8p2A6viP
— Ahmed Says (@AhmedGT_) May 24, 2026
“लोकांनी माझ्या ऑफिसमध्ये फोन करून शिवीगाळ सुरू केली!”
View this post on Instagram
श्रेष्ठा अय्यरने व्हिडीओमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, “मी जो व्हिडीओ बनवला होता, तो केवळ निखळ मनोरंजनाचा आणि एक थट्टा-मस्करीचा भाग होता. लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून तो गरजेपेक्षा जास्त वाढवला. मी कोणत्याही खेळाडूचा किंवा टीमचा अपमान करत नव्हते. पण आता ही ट्रोलिंग वैयक्तिक हल्ल्यात बदलली आहे. लोक थेट माझ्या ऑफिसमध्ये फोन करून मला, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या कुटुंबाला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत आहेत. नको त्या वेळी फोन करून मानसिक त्रास दिला जात आहे.”
तिने पुढे अत्यंत भावुक होत सांगितले की, “माझा स्वतःचा भाऊ एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे, त्यामुळे मला प्रत्येक क्रिकेटपटूबद्दल आणि त्यांच्या कष्टांबद्दल प्रचंड आदर आहे. मी कधीही कोणाबद्दल द्वेष पसरवणार नाही.”
“माझ्या भावाच्या जय-पराजयात मी नेहमी त्याच्यासोबत असेन”
View this post on Instagram
ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना श्रेष्ठा म्हणाली की, “तुम्हाला माझ्यावर राग काढायचा असेल तर खुशाल काढा, पण माझ्या प्रोफेशनला आणि माझ्या कुटुंबाला यात ओढू नका. माझा भाऊ सामन्यात जिंको किंवा हारो, त्याची बहीण म्हणून मी आयुष्यभर खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहीन.” क्रीडा जगतात खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः महिलांना अशा प्रकारे सोशल मीडियावर अश्लील भाषेत ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र, आता काही चाहते श्रेष्ठाच्या या व्हिडिओनंतर तिच्या समर्थनात पोस्ट करत आहेत.





