Shreyas Iyer Opportunity : टीम इंडियात मोठा फेरबदल! ‘या’ स्टार खेळाडूच्याऐवजी श्रेयस अय्यरची जागा फिक्स
Shreyas Iyer Opportunity : तिलक वर्मा उर्वरित दोन टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली.

Shreyas Iyer Opportunity for IND vs NZ T20 Series : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली असली, तरी खेळाडूंच्या दुखापतींनी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवली आहे.
युवा फलंदाज तिलक वर्मा अद्याप पूर्णपणे फिट न झाल्यामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) Opportunity संघात कायम ठेवण्यात आले आहे. हे शेवटचे दोन सामने विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरम येथे खेळवले जाणार आहेत.
तिलक वर्माची स्थिती काय?
विजय हजारे ट्रॉफी दरम्यान तिलक वर्माला त्रासाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर त्याच्यावर ‘स्टिकुलर टॉर्शन’ (Sticular Torsion) शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तो बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) मध्ये रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे तो थेट टी-२० वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. निवड समिती त्याला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय मैदानात उतरवण्याची घाई करणार नाही.
श्रेयस अय्यरसाठी सुवर्णसंधी –
वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला या मालिकेत अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, शेवटच्या दोन सामन्यांसाठी त्याला संघात कायम ठेवल्याने त्याला आपली चमक दाखवण्याची संधी मिळू शकते. जर तिलक वर्मा वर्ल्ड कपपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही, तर श्रेयस अय्यरसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे उघडू शकतात. अय्यरने आपला शेवटचा टी-२० सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता.
BCCI informs #bcci #shreyasiyer #tilakvarma pic.twitter.com/XTNPmyZDnG
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) January 26, 2026
वॉशिंग्टन सुंदर वर्ल्ड कपला मुकणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेसाठी श्रेयस अय्यरला संधी
दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. ११ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत गोलंदाजी करताना सुंदरच्या फासळीत तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. स्कॅनमध्ये दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे.
रवी बिश्नोईचा दावा मजबूत: सुंदरच्या अनुपस्थितीत संघात आलेल्या रवी बिश्नोईने गुवाहाटी टी-२० मध्ये ४ षटकांत केवळ १८ धावा देऊन २ विकेट्स घेत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जर सुंदर वेळेत तंदुरुस्त झाला नाही, तर बिश्नोईची वर्ल्ड कप संघात वर्णी लागणे निश्चित मानले जात आहे. टी-२० विश्वचषकासाठी संघात बदल करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी आहे.





