Tilak Varma : भारतीय संघाचा तारणहार तिलक वर्माने अनेकदा आपल्या खेळीच्या जोरावर संघाला कठीण विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. आशिया चषक २०२५ च्या पाकिस्तानविरूद्ध फायनलमधील त्याची इनिंग कोणीच विसरू शकणार नाही. त्याने या सामन्यात संयमी खेळी करत टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून वाचवलं आणि संघाला स्पर्धेचं जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. शिवाय, त्याने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यादरम्यान त्याने विराट कोहलीला मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकून कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक सरासरी नोंदवली आहे. तिलकची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी आहे, तो या क्रमवारीत विराट कोहलीला मागे मागे टाकून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात, त्याने हुशारीने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतल्याने, टीम इंडियाकडे आता तिलकच्या रूपात एक नवीन चेस मास्टर आहे. त्याचे रेकॉर्डस् या सगळ्याची साक्ष आहे. कोणत्याही संघाविरूद्ध भारताची टी-२०मधील सर्वाधिक सरासरी (किमान ३०० धावा) ७०.५० – तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका* ७०.२८ – विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान ६७.८ – विराट कोहली विरुद्ध श्रीलंका ५८.८३ – केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज ५७.० – विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी (किमान ५०० धावा) ६८.० – तिलक वर्मा* ६७.१ – विराट कोहली ४७.७१ – एमएस धोनी ४५.५५ – जेपी ड्युमिनी ४४.९३ – कुमार संगकारा ४ हजार धावा पूर्ण तिलक वर्माने धरमशाला टी-२० सामन्यात नाबाद २५ धावा करत टी-२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ४ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. तिलक वर्माने १२५ डावांमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.