Shreyas Iyer comeback in T20I Cricket : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला तिलक वर्माच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. तिलकच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोणाला संधी द्यायची, यावरून सध्या भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पहिल्या सामन्यात इशान किशनला संधी देण्यात आली, मात्र त्याने निराशा केली. या पार्श्वभूमीवर माजी वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉनने श्रेयस अय्यरच्या नावाला पसंती दिली आहे. इशान किशनची संधी हुकली? देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर इशान किशनने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नंबर ३ वर फलंदाजी करताना त्याला केवळ ८ धावा करता आल्या. फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातही त्याने दोन महत्त्वाचे झेल सोडले. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने ३२ चेंडूत ७६ धावा करुन सर्वाचे लक्ष वेधून घेतलं आहे. पण त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. वरुण अॅरॉनने निवडला तिलक वर्माचा परफेक्ट रिप्लेसमेंट वरुण अॅरॉनचा श्रेयस अय्यरला पाठिंबा – वरुण अरॉनच्या मते, कठीण परिस्थितीत श्रेयस अय्यर हा इशानपेक्षा जास्त विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. तो म्हणाला, “जर संघाला बाहेरून खेळाडू निवडायचा असेल, तर श्रेयस अय्यर सर्वात योग्य आहे. तो सध्या वन-डे टीमचा उपकर्णधार देखील आहे. इशान चांगला खेळाडू आहे, पण संकटाच्या काळात श्रेयस आपली जबाबदारी चोख पार पाडू शकतो.” हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीचा रणजी ट्रॉफीत कहर! ५ विकेट्स घेत सर्व्हिसेसचं मोडलं कंबरडं श्रेयस अय्यरच का? श्रेयस अय्यरकडे मधल्या फळीत खेळण्याचा मोठा अनुभव आहे. फिरकी गोलंदाजी खेळण्यात तो माहिर मानला जातो. जर संघाने स्क्वाडमधील खेळाडूंवरच विश्वास दाखवायचे ठरवले तर इशानला पुन्हा संधी मिळेल, पण वरुण अॅरॉनच्या मते अनुभवाचा विचार करता श्रेयस सरस ठरतो.