पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत सोमय्या पायऱ्यावरून खाली कोसळले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले. या घटनेत सोमय्या जखमी झाले असून त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.