करमाळा – तालुक्याच्या ग्रामीण भागासह सातोली परिसरात “शिवरत्न” संस्था विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षरोपण, वृक्ष संवर्धन, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षा व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन आदी कार्यक्रम राबविले जातात. दिनदर्शिकेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत व इतर विविध शासकीय योजनांची माहिती घरा-घरात पोहचवली जात आहे, अशा समाजोपयोगी कार्यक्रमांचा ग्रामीण भागाच्या विकासामध्ये नक्कीच मोलाचा वाटा आहे, असे मत विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्था-करमाळा (सातोली) या सामाजिक संस्थेच्या 2022 या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शिवरत्न ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष अमरजीत साळुंके, सुदर्शन तळेकर (केम), महेशराजे भोसले (नेरले), शिवशंकर माने (कंदर), आबासाहेब टापरे (राजुरी), नरेंदसिंह ठाकूर (करमाळा), विकास मोरे (केत्तुर), शत्रुघ्न मोरे (वडशिवणे), शिवाजी जाधव (राजुरी), वैजीनाथ भगत (कंदर), सचिन खराडे (केत्तुर), राहुल घोगरे (नेरले), दत्तात्रय नागटिळक (वडशिवणे), दुर्वास पांडव (कविटगाव) आदी उपस्थित होते.